एक कळी उमललेली
एक कळी उमललेली
1 min
205
एक उमललेली कळी, स्वप्न त्यात लपलेली
प्रत्येक स्वप्न तिची आहेत सुगंधाने भरलेली
तिच्या सुवासातच आहे एक कांडी जादूची
सगळा आसमंतच जणू दरवळून टाकण्याची
कशी ती टप्पोरी पांढरी, पाना आड दडलेली
थंडगार त्या धुक्यातले दव आहे पांघरलेली
खरच!! उमललेल्या कळी सारख असावं का
आनंद जगाला देऊन ही, मन भरून जगावं का
सुगंध दुसऱ्याला देऊन, स्वतः सुगंधित व्हावं का,
वाटता वाटता ते सुख, आपणही सुखीच व्हावं का?
एक उमललेली कळी, स्वप्न त्यात लपलेली
प्रत्येक स्वप्न तिची आहेत सुगंध भरलेली
