Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

चिंतन

चिंतन

1 min
96


    *आधार हा शब्द पाहिला तरी आधार मिळाल्याचा भास होतो...*

  *भरकटलेल्या विचारांना आधार शब्दांचा. आधार मानसिकतेचा.गरीबाला आधार* *संपत्तीचा.ज्याला कोणी नाही त्याला आधार प्रेमाचा. निराधार बालकांना आधार आईबाबांचा.हुशार व्यक्तीला आधार बौद्धिक विचारांचा. वृद्ध जोडप्याला आधार कामवाल्या बाईचा.आजारी मानवाला आधार डाॅक्टरांचा. शाळेत मुलांना आधार बाईंचा.नुकत्याच जन्मलेल्या बाळाला आधार आईचा.अशी कितीतरी उदाहरणे देता येतील..*

  *आधार हा शब्दच असा आहे की काय वर्णावी महती या शब्दाची. जीवनात प्रत्येकाला खरच कोणत्या न कोणत्या कारणासाठी आधाराची गरज आहे.*

  *लता वेली यांना देखील भक्कम आधाराची गरज असते त्या शिवाय त्यांची योग्य वाढ होत नाही.*

  *घरातील निर्जीव वस्तू घेतली तरी तिला आधाराची गरज असतेच.उदा..टेबल,खुर्ची,टीपाॅय,कपाट ....*

   *चला तर आपणही समाजाचा एक आधाराचा हिस्सा होवू या.प्रेम देवू.एकोपा राखूया.आपल्याकडे आहे त्यातील थोडा हिस्सा गरजूंना देवू या.आता लाॅकडाऊनच्या काळात आपल्याच बिल्डिंगच्या सफाईकामगार,सिक्युरिटी ,वाॅचमन यांना जमेल तसे चहापाणी ,नाष्टा देवू या.*


Rate this content
Log in