भटका
भटका


आपटे कॉलनी नेहमी माणसांनी गजबजलेली सगळे मिळून मिसळून राहायाचे उत्सव एकत्र साजरे करायचे त्या कॉलनीतले पाळलेले जनावर सुद्धा मिळून भटकायची कुण्या परक्या माणूस जनावर गेट च्या आत आली तर मोठयाने ओरडत सगळे त्यांना स्क्युरिटी फोर्स म्हणायचे दिवस भर भटकुन संध्यकाळी आपल्या निवास्थानी निघून जायची त्या फोर्स मध्ये मनी माऊ आणि श्वान होते ते मौज मस्ती राहायचे ...
गेटच्या बाहेर नेहमी एक भटका कुत्रा येऊन नेहमी त्याची मौज मस्ती पाहायचा त्याच एकत्रित खाणं जगणं तो नेहमी पाहत असे पण गेटच्या आता येणं त्याला कधी जमले नाही
तो नेहमी एकटा तर कधी भटक्या टोळीत फिरायचा कुत्रे नेण्याची गाडी आली कि धुम टोकून पळून जायचा कधी गाडी खाली लपायचा तर कधी काही खायला मिळेल ह्या आशेने फिरत राहायचा ...
त्या स्क्युरिटी फोर्स मधील एक कुत्रा नेहमी त्या श्वानाला पहायच्या त्या दिवशी तो त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला "मी तुला नेहमी पाहतो तू इथे उभा राहून आम्हाला पाहत असतोस"
"हो मी तुम्हाला पाहतो तुमचं एकत्रित राहणं खेळणं जगणं मला आवडत"
"हो का आमची पलटण न्यारीच आहे"" तू कुठे राहतोस"?
"मी मिळेल तिथे मी कुठला पाळीव नाही भटका आहे जिथे मिळेल तिथेच आपल घर करतो"
"अरेरे"
"पण तुमचं जगणं मला आवडत खूप मजेत असाल ना तुम्ही"
"हो तर ह्या कॉलोनीतले लोक खूप चांगले आहेत आणि आम्हला खायला पण नवीन डिशेस मिळतात ".
"बरं आहे तुमचं"
"मी तुमचा मित्र होऊ शकतो "
"का नाही "
नाही मी भटका आहे ना तुम्ही पाळीव माझ्या पेक्षा जरा सुधारलेले
"अरे तस काही नाही आमच्या पलटन मध्ये मांजर सुद्धा आहेत आम्ही मिळून मिसळून राहतो शेवटी आम्ही प्राणी माणसासारखे भेदभाव करणारे नाहीत जर तुला आमचा मित्र व्ह्याच असेल तर खरच चंगली गोष्ट आहे"
"पण इतर मला स्वीकारतील"?
"का नाही सगळे एवढे चांगले आहेत कि आम्ही मनाने जोडलो आहोत "
"चल मग तुझ्या नवीन माझ्या मित्रांना भेट"
"पण मी आत कसा येऊ शकतो"
"मी आहे ना"( आणि ते दोघे आत जातात)
"अरे हे कोणाला आणलास बरोबर "
"हा आमचा नवीन मित्र त्याला कोणी नाही तो आपल्याबरोबर राहील "
"अरे पण कोण कुठला ?"
"अरे तो एकटा आहे आसरा आणि आधार नाही त्याचकडे आणि असच आपलं जीवन असत तर"
"हो तेही बरोबर आहे "
"दोस्त तुझे आम्ही सगळे स्वागत करतो "
"अरे हे काय तुझ्या डोळ्यात पाणी "
"हो भावना काय फक्त माणसांनाच असतात आम्हला पण आहेत फरक कि आपण बोलू शकत नाही"
"हे मात्र बरोबर बोललास मित्रा तू आज पासून आमचा आहेस "
"चला रे आपल्या मित्राचं स्वागत करूया श्वानांनी तोड वर करून तर मनी माऊ आणि बोक्यानी एकच ललकारी दिली"