बेडुकरावांचे दिवा सप्न
बेडुकरावांचे दिवा सप्न
बेडुकरावांचे दिवा सप्न
चिखलात गटारीत राहणार्या बेडूकरावांना त्याचे आईवडील सांगायचे माणुस प्राणी हा हुशार, समजुतदार प्राणी आहे ह्या जगात.
पण बेडुकराव पाहात असायचा माणसाला दारू पिऊन गटारीत पडलेला. त्याला वाटायचे असे माणसाचे वागणे म्हणजे समजुतदार वागणे आहे. दारूच्या बाटल्या आजुबाजुला पडलेल्या व एक दारूची बाटली हातात हे म्हणेजेच हुशार समजुतदार माणसाची लक्षणे...
खरच किती छान हा माणुस..
एक दिवस त्यालाही वाटले माणसारखे वागावे.
गटारी जवळच्या चिखलात त्याला एक बाक दिसला... थोड्यावेळ आपण आराम करावा असे वाटले व तो त्या बाकावर जावुन आराम करायला बसला.
छान थंड वारा वाहत होता... त्याने कधी आपले हात पाय पसरवले हे त्यालाही कळले नाही.
छान आरामात तो पसरला व दिवा सप्न पाहु लागला.
माणसासारखे आपणही आता हुशार झालो, छान छान हिरवे कपडे घातले आहे. लाल लाल लिपस्टिक लावले... पार्टिला गेलो आहोत...तिथे दारू पितोय... वेगवेगळे ब्रँड...
एक एक करत तो एक एक बाटली पिऊन रीकामी करत गेला... बाकाच्या आजुबाजुलाच त्या फेकल्या... हातात एक होतीच...
त्याला छान छान वाटत होतं...आपण आता हुशार समजुतदार माणुस झालो असे त्याला वाटत होते...
पण बेडुकरावांना हे चुकीचे आहे हे सांगायला जवळपास कोणीच नव्हते.