बालपण
बालपण
अस वाटत पुन्हा लहान व्हावं
शाळेत जाण्यासाठी उठ लवकर,
आवर लवकर तीनदा सांगून झालं
तरी परत थांब थोडावेळ म्हणून अंथरूनावरच पडून रहावं.।
अस वाटत पुन्हा लहान व्हावं
डब्यात मला आवडीचाच पदार्थ पाहिजे म्हणून सकाळीच त्यासाठी हट्ट करत बसावं।
अस वाटत पुन्हा लहान व्हावं
आई शाळेत सोडवायला आली की तिच बोट घट्ट धरून ठेवावं हळूच डोळ्यातून गंगा जमुना ने वहाव ,ती दूरवर जाई पर्यंत तिच्याकडे केविलवाण्या नजरेनं बघत रहावं।
शाळेत डबा खाण झाल्यावर
बसल्या बसल्या डोळे लावून सारखी डुकली घेऊन बाईंचा मोठा आवाज आला की लगेच दचकून उठाव ।
पावसाळ्यात मोठा पाऊस आला की आज शाळेला सुट्टी भेटणार म्हणून आनंदानं नाचणं ,कागदाची बोट करून पाण्यात सोडून लांब जाईपर्यंत आनंदान टाळ्या वाजवणं।
बालपण म्हणजे आईच्या मांडीवर मायेचं पांघरून घेऊन झोपणं आईला अंगाई गीत किंवा गोष्ट सांगायला लावणं।
लहानपण म्हणजे वडिलांसोबत बाहेर गेल्यावर आवडीच्या वस्तू , आवडीचा खाऊ हट्टाने मागणं आणि लगेच त्यांनी ते आनंदाने घेऊन देणं।
बालपण म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी एक नवीन ड्रेस घेतला की, आनंदान उड्या मारत सगळ्या मित्र/मैत्रिणींना दाखवत फिरणं।
बालपण म्हणजे आनंदी झरा
निरागस, निस्वार्थी मन।
नाही कसला तान तणाव
आई वडिलांच्या जीवावर
आनंदी, उत्साही, समाधानी ,खोडकर बालपण।
