STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

4  

Samiksha Jamkhedkar

Others

बालपण

बालपण

2 mins
415

"लहानपण देगा देवा।

मुंगी साखरेचा रवा।।"


असे तुकाराम महाराज यांनी म्हटलेलं आहे.खरच बालपणीचा काळ इतका सुखाचा असतो की, बालपणीच्या आठवणी काढल्या तरी माणूस सुखावतो.


आपल्या जीवनातील बालपण म्हणजे आपण जपून ठेवलेली ठेव असते. या ठेवींच्या आठवणीवरच 

आपण आपली कित्येक वर्षे सुखाने घालवलेले असतात.


व्यक्ती गरीब असो व श्रीमंत परंतु प्रत्येकासाठी आपल्या बालपणीचा काळ किती सुखाचा किती रम्य असतो.


माणूस जेंव्हा जन्माला येतो तेंव्हा त्याला काही कळत नसते, तेव्हाच्या आठवणी तो ऐकून घेतो आणि खुदकन गालातल्या गालात हसून तो त्या आपल्याकडे साठवून ठेवतो. आणि कळत असलेल्या आठवणी तो स्वतःताच जमा करून ठेवतो.


त्याच्यासाठी या आठवणी खूप अनमोल ,अविस्मरणीय, लाखमोलाच्या असतात. 

सगळ्यात पहिलं ते रांगण हवं ते उचलून तोंडात टाकणं त्यामुळे आईला सारखं लक्ष द्यावे लागत असे व घर स्वच्छ ठेवावे लागत असे. नंतर कशाचा तरी आधार घेऊन हळूच उभं राहणं व चालण्यासाठी धडपडन,रडणं, पुन्हा उभे राहून तेच तेच करणं आणि आपल्याला चालता यायला लागलं हे आईने दुरून गुपचूप बघणं ,एखादी वस्तू आपल्यासमोर पकडून ती दूरदूर घेऊन जाण आणि आपल्याला चालता यायला लागलं हे पाहून आईने मनातल्या मनात आनंदी होणं , आपण बोलत असलेले बोबडे बोल परत परत म्हणून घेणं, आपल्यासाखच बोबडे बोलून आपल्याला बोलणं शिकवण, आपल्याला चिऊ-काऊच्या गोष्टी सांगून पोटभर जेवू घालणं, किती अविस्मरणीय आहे हे? बालपणीची आठवण जरी काढली की आपण क्षणात छोटा बाळ होऊन जातो .

आभ्यासासाठी झालेली शिक्षा, खाल्लेला मार, आईचे पाठीत बसलेले धपाटे,पुन्हा आईनेच आपल्याला मायेने जवळ घेणे, किती सुखकारक होत सगळं.

बाबा कामासाठी बाहेर जात पण घरात आल्यावर पहिले आपल्याबद्दल विचारणं, आपण घरात असल्यावर आपल्या हातात मायेन खाऊचा पूडा देणं, दिवसभर केलेल्या पराक्रमाचा तपशील विचारणं खरच खूपच सुंदर होत बालपण.


शाळेतील देखील भांडण ,कैऱ्या चिंचा, बोर पाडून आईकडे आलेली भांडण परत अस होणार नाही म्हणून तिने आपल्या बाजूने बोलणं, आई वडिलांनी केलेल्या शिक्षेमागे आपलंच भलं होणार हे आताशी कळत.

आपल्या भविष्यकाळाची दोरी लहानपणी झालेल्या शिक्षेवरच अवलंबून असते,

त्यामुळेच तर आपले भविष्य आणि आपण घडत असतो.

लहानपणी रडले कि, पाहिजे ती वस्तू हजर ,कपडे हजर, खाऊ हजर,सहलीला जायला मिळते, तो लहानपणीचा काळच खूप सुखाचा,लाडाचा असतो ना? कसली जबाबदारी, ना कसली चिंता, खरच किती सुंदर रम्य असत ना ते निरागस बालपण हो ना ? आज बालपण आठवलं आणि माझ्या शब्दात ते मांडायचा प्रयत्न केला .


Rate this content
Log in