अशीही दिवाळी
अशीही दिवाळी
लक्ष्मीपूजन होत म्हणून आज सुनंदा लवकर उठली होती.
सकाळी एक पणती मिनमिनती तिने दारात लावली. सकाळीच अभ्यंग स्नान केल.
परिस्थिती बेताचीच शेतात काम करायची दोघेजण एक मुलगा एक मुलगी असा त्यांचा संसार.
मुलं देखील तिच्या मागोमाग उठली.बाहेर फटाके वाजत होती.
त्या आवाजाने दोघे भावंडे उठली होती.
मुलगी मोठी तीच नाव स्वाती मुलगा लहान त्याच नाव स्वप्नील ,आईने छान नाव ठेवली होती.शाळेत त्यांची आई खूप हुशार होती.अशी आजी संगायची परंतु, लवकर लग्न झाल.नवऱ्याचं नाव सुधीर तो शेती करायचा, त्याचे वडील लवकर गेले होते.
शेती कोण बघणार जेमतेम शिकून त्याने शेतीकडे लक्ष द्यायचे ठरवले.
सगळ्यांनी पटपट आवरलं सुनंदाने किराणा उधार आणून थोडं फराळाच केलं होतं.
सगळ्याच फराळाच झालं मुल बाहेर खेळायला गेली होती.
मित्र मैत्रिणी फटाके वाजवत होती.आईने आदल्या दिवशीच समजून सांगितलं होतं कोणाच्या फाटक्याला हात लावायचा नाही.
कोणी काही दील तर नको म्हणायचं म्हणून लांबुन गंमत बघून दोघे बहीण भाऊ टाळ्या वाजवत होते.
त्यांच्याकडे जे आहे ते मांडून त्यांनी लक्ष्मीपूजन केलं.
परिस्थिती जशी आहे त्याच्यात आनंदी राहणं हे सुनंदा शिकली होती.तशीच तिचे मुले समजदार होती.
सुनंदाला एक भाऊ तोही गरीबच होता.हातावरची कमाई त्याची कसे बसे घरातल्यांची पोट भरवायचा.
दुसऱ्या दिवशी पाडवा भाऊबीज
मामाकडे जायचं म्हणून मुलं खुश होती.परंतु भावाची गरीब परिस्थिती म्हणून त्याच्याकडे दिवाळी कशी करणार म्हणून सुनंदाने घरूनच सगळा किराणा नेला होता.
भावा बहिणीचं नात्याची कोणी बरोबरी करू शकत नाही.
त्याच वर्णन शब्दात सांगणं कठीण.
आपली एकुलती एक बहीण येणार म्हणून त्याने थोडे पैसे मागे ठेवले होते.
मामाकडे जायचे म्हणून सगळ्यांनी लवकर आवरलं सकाळच्या बसने मामाकडे पोहचले.
तशी म्हातारी आई दाराकडे डोळे लावून वाटच बघत होती.
थोडा वेळातच ती घरी पोहचली तस तिने सुनेला आवाज दिला, अग सुनबाई लवकर ये ,"मुलगी दिवाळीला आली तुकडा पाणी ओवाळ " तस तिने सगळं आवरून ठेवलं होतं.
त्यांचं नातं बहिणीसारखच होत.त्या एकमेकींना जीव लावत होत्या.बहिणीच्या पिशवीतील आणलेलं सामान पाहून ताई कशाला एवढं आणलं म्हणत होता.
राहू दे रे माझ्याकडून चहा, पाणी झाला .पुरणाचा स्वयंपाक केला.सुनंदा देखील रिकामी बसत नव्हती ती भाऊजाईला कामात मदत करायची.आईला काम होत नव्हतं म्हणून ती बरोबरीने काम करायची. कारण आईचे शब्द तिने नेहमी लक्षात ठेवले होते,आई नेहमी म्हणायची, "आग सुनंदे, माणूस प्यार नसत त्याच काम प्यार असत.
म्हणून भौजाई पण खुश असायची जीव लावायची.तिला देखील कोणी भाऊ बहीण नव्हतं म्हणून त्या एकमेकींना जीव लावायच्या.
जेवणं झाल्यावर सगळे बाजारात गेले .भावाने साठवलेल्या पैशात मुलांना थोडे फटाके, कपडे, बहिणीला माहेरची साडी घेतली.
मुलं खुश झाली, नवे कपडे घालू फटाके वाजवले आनंदी झाले.
सूनंदाच्या आईला खूप बरे वाटले,
आपल्या लेकीला माहेरची साडी ओवाळणी, जावयाला ड्रेस मुलांना कपडे घेतले म्हणून, सुनंदा हुशार होती ,तिच्या लक्षात आलं ती म्हणाली तू ओवाळ यांना भौजाईने त्यांना ओवाळले, सुनंदाने आधीच छानशी साडी घेऊन ठेवली होती ती त्यांनी टाकली.
भाऊजईचे डोळे अंदाश्रूंने भरून आले.आपल्याला भाऊ नाही हे वहिनीने याची जाणीव होऊ दिली नाही. किती माया प्रेम आहे यांच आमच्या दोघांवर .
घरची परिस्थिती बेताची असून सगळं आम्हाला सांभाळून घेतलं आमचं वाण उघड होऊ दिलं नाही .खरच अशी समजूदार नणंद प्रत्येकाच्या घरात असावी.अशी तिने देवाला प्रार्थना केली.नंदेला चोळी,बांगडी करून आनंदाने फराळपाणी देऊन वाटी लावले.
