STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

अरे संसार संसार

अरे संसार संसार

3 mins
280

यशश्री आई वडिलांची एकुलती एक मुलगी खूप लाडात वाढलेली,हुशार, समंजस , स्वाभिमानी, आईवडिल तिला तळहाताच्या फोडासारखं जपत होते.


अभ्यासात हुशार असल्यामुळे शाळा, अभ्यास, एवढंच तीच विश्व होत.सगळ्या विषयाचा चांगला अभ्यास करून शाळेत पहिला नंबर घ्यायचा हा तिचा नियमच बनला होता .शाळेत आपल्या पुढे कोणी गेलं की तिला आवडत नसे.त्यामुळे ती नेहमी अभ्यासात गर्क असायची.त्यामुळे तिला पुस्तकी कीडा नाव पडले होते.


हळू हळू यशश्री मोठी झाली 10 वीत तिने 98%मिळवुन सगळीकडे तिच्या आईवडिलांच आणि तीच कौतुक होत होत.परंतु तिला घरकाम काहीच येत नव्हतं हुशार असल्यामुळे आईनेही कधी काही सांगितले नव्हते.12 विला देखील तिने 92%मिळवून क्रमांक पटकवला होता.पुढेही तिने अभ्यास करून M.B.B.S कम्प्लेट केले होते.आता तिच्या हुशारपणामुळे तिच्यावरून तिच्या आई-वडिलांची ओळख होत होती.सगळं शिक्षण संपल आता नातेवाईक शेजारी पाजारी आता लग्नाचा विषय काढू लागले.


परंतु घरकामात काही लक्ष नसल्यामुळे तिला साधा चहा देखील नीट येत नव्हता.तिचीच एक मैत्रीण प्रगती तिच्यासोबतच होती पण ,तिच्याइतकीच हुशार पण तिची आई कामाच्या बाबतीत जरा कडक होती म्हणून शिक्षण करता करता आई तिला संध्याकाळचा स्वयंपाक सांगत असे, शिकवत असे आणि समजून सांगत असे,"बाईच्या जातील कुठेही गेलं तर सगळं स्वयपाकपाणी यायलाच हवा नाहीतर आईचा सासरी उद्धार होतो.म्हणून आई तिच्यासाठी कठोर बनून तिच्याकडून सगळा स्वयंपाक करून घेत असे.

त्यामुळे ती सगळ्या गोष्टीत हुशार होती.

पण यशश्रीचे तसे नव्हते घरकाम तिला काही येत नव्हते. आईने तिला सवय लावली नाही म्हणून तिलाही काम करायच जीवावर येत असे.

आता लग्नासाठी स्थळ येऊ लागली. यशश्री साठी एक सुंदर, हुशार, तिच्याइतकाच शिकलेला परंतु बाहेरगावी राहून शिक्षण करणारा, स्वतः घरी सगळं बनून खाणारा, त्याला सगळे पदार्थ चविष्ट बनवता येत होते.लग्न जमले थाटात लग्न झाले.एकुलती एक मुलगी काय थाट बघायचा तो?सगळं चांगलं होत ,पण घरकामाचा कंटाळा असल्यामुळे पुढे कसे होणार याच आईला Tension होतच.


होणाऱ्या जावयाला यशश्रीच्या आईने आधीच कल्पना दिली होती.आई तुम्ही काळजी करू नका मी आहे ना?सासू सासऱ्याना देखील माहीत होते.लग्न झाले दोघे डॉक्टर असल्यामुळे प्रॅक्टिस साठी दोघे शहरात होते .यशश्री ने सगळ्या घरकामाला बाई लावली होती.परंतु थोड्यादिवसाने ती आजारी पडल्यामुळे ती काही येत नाही म्हटल्यावर यशश्रीला जाम Tension आलं होतं.त्यात दुसऱ्या दिवशी सासू सासरे येणार असा फोन आला आपल्या मुलाच्या संसार कसा चालला ते बघायला.आता कामवाली नाही कस होणार, मी इतक्या दिवसात शिकायला हवं होतं.तिचा उतरलेला चेहरा बघून यश मनातल्या मनात हसत होता.


सकाळी उठल्यावर यशचे आईबाबा दारातच उभे होते.आतातर यशस्विनीला काय करावे सुचेना, आज यशचे आईबाबा येणार म्हणून दोघेही सुट्टीवर होते.यश तसा हुशार होता आज तो लवकर उठला होता .त्याने सगळा स्वयंपाक करुन ठेऊन kitchen स्वच्छ आवरून ठेवले होते.हे पाहून यशश्रीचे tension दूर झाले होते.परंतु यश आज सकाळी उठल्यापासून अरे संसार संसार जसा तवा चुलावर आधी हाताला चटके तेंव्हा मिळते भाकर हेच गाण म्हणत होता.यशशरीच्या ते लक्षात आल होत.जेवण आटोपली सासू-सासऱ्यांनी स्वयंपाक छान झाला म्हणून यशस्वीच तोंडभरून कौतुक केलं.

दुसऱ्या दिवशी ते निघून गेले.आपल्या नवऱ्याने आपली वेळ निभावून नेली म्हणून ती त्याला डोळे रडवेले करून Thanks म्हणत आपोआप डोळ्यात पाण्याच्या धाराना सावरत म्हणाली,आज मी सगळं स्वयपाक करणार आणि तो तू मला शिकवणार, असे म्हणत दोघे कामाला लागली .तव्यवरची वाकडी तीकडी पहिली पोळी शेकत आज यशश्री गाणं म्हणत होती,आणि यशही तिच्यासोबत गुणगुणत होता,"अरे संसार संसार आणि असच रोज शिकत सगळं शिकून घेत ,ती आता डॉक्टर असूनही एक गृहिणी आणि सुंदर अन्नपूर्णा बनली होती.

"नांदा सौख्य भरे "


Rate this content
Log in