अबोल भावना बैलाच्या
अबोल भावना बैलाच्या
संतोषला पहिल्यापासून शेतीची आवड म्हणून बागायती शेती करून घेतली.संतोष शेतात राब राब राबायचा आणि दरवर्षी भरपूर पीक काढायचा सोबत त्यानी दोन बैलजोडी विकत घेतली होती.ती देखील संतोषसोबत शेतात बरोबरीनं मेहनत करायची.संतोषने लाडाने त्यांची नावे सर्जा राजा ठेवली होती.काम झाल्यावर रोज संतोष त्या बैलांचे लाड करत असत.आणि नेहमी मायेने त्यांच्या खाण्यापिण्याकडे लक्ष देत असत.मुक्या जनावरांना देखील जीव लावलेलं कळत.संतोषच्या पायाची चाहूल लागताच बैल आनंदाने खुश होत असत. एक दिवस अचानक काम करता करता सर्जाला काहीतरी लागलं आणि तो लंगडा झाला त्याला काही काम जमेना.त्याला आपराध्या सारखं वाटू लागलं आपल्या मालकाला आपण कामात मदत करू शकत नाही याच त्याला वाईट वाटतं असे. त्याच्या नजरेतून ते मालकाला जाणवत असे.तरी मालकाने त्याला कधी त्याची जाणीव होऊ दिली नाही.
सर्जा रोज राजाला सांगत असे मी सोबत नाही म्हणून तुला एकट्यालाच सर्व काम करावे लागते.तस काही नाही म्हणून डोळ्यात आसवं आणत असे. एक दिवस घरच्यांनी त्याला विकण्याचा निर्णय घेतला.सगळ्यांनी संतोषला समजावून सांगितले आता त्याला काम होत नाही.ही सगळी चर्चा गोठयात सर्जा राजा दोघांच्या कानावर पडत होती.दोघांना खूप वाईट वाटले.संतोष आज सकाळी उठला गोठयात जाऊन सरजाच्या खांद्यावर हात फिरवून लाड करू लागला आज सर्जा दुःखी दिसत होता.आपल्या मालकाला सोडून जावे लागणार याचे दुःख झालेले त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते.सगळं आवरून संतोषने त्याला बाजारात नेले.एकतर पायाने अधू असल्यामुळं गिर्हाईक त्याला घेत नव्हते.एक गिऱ्हाईक लागले आणि मालक, लगंडा बैल म्हणून जणू त्याच्याकडे रागाने बघत होता.पैशाचा व्यवहार झाला.
सर्जाने मालकाकडे बघितले तेव्हा सर्जाच्या डोळ्याला अक्षरशः पाण्याच्या धारा लागल्या तेंव्हा संतोषला खूप वाईट वाटले.त्याने सर्जाच्या खांद्यावरुन हात फिरवला आणि म्हणाला,तुझ्याकडून काम नाही झाले तरी चालेल.तुला होत होते तेंव्हा तू खूप काम केले.मला हा बैल विकायचा नाही असे ठामपणे सांगून परत सर्जाला घरी घेऊन आला.दोघे आनंदाश्रू भरल्या डोळ्यांनी एकमेकांकडे बघत राहिले.आणि राजाचा तर आनंद गगनात मावेना.
