Nilesh Bamne

Others

3  

Nilesh Bamne

Others

आय लव्ह यु

आय लव्ह यु

15 mins
1.4K


विजय ! एक सर्वसामान्य दिसणारा माणूस एका बऱ्यापैकी महाग असणाऱ्या हॉटेलात कोणीतरी येण्याची वाट पहात झुरका मारत चहा पित असतो पण कपाने ! बशीने चहा पिणे त्याच्या गावातच नव्हते. गरम गरम चहाचा कप तो मिनिटात रिकामा करत असे पण येथे वेळ काढायचा होता म्हणून तो थेंब थेंब चहा पीत होता. चहा पिता पिता आजूबाजूचेच नव्हे तर हॉटेलच्या समोरून जाणाऱ्या रस्तावरचे सौंदर्यही तो आपल्या चिमुकल्या डोळ्यात साठवून घेत होता. तो कधीही हॉटेलात गेल्यावर बसण्यासाठी असे टेबल शोधत असे जेथे बसून संपूर्ण हॉटेल तर दिसेलच पण शक्य असेल तर बाहेरचेही दिसेल. विजय बाहेरचे नजारे पहाण्यात गुंग असताना विजयचा मोबाईल खणखणला, विजय मोबाईलवर म्हणाला,’ आत ये ! मी लाल रंगाचा शर्ट घातला आहे. खरं म्हणजे त्याला परिधान केला आहे म्हणायचे होते पण समोरच्या व्यक्तीच्या डोक्यावरून जाईल म्हणून त्याने ते बोलायचे टाळले. विजय हॉटेलच्या दरवाज्याकडे पहात असताना त्याला समोरून एक सुंदर नाही तर मादक तरुणी येताना दिसली आणि त्याच्या डोक्यात विचारांचा खेळ सुरु झाला सुंदर असणे आणि मादक दिसणे यात बरेच अंतर आहे. गोरा रंग असणाऱ्या, गालावर खळ्या असणाऱ्या ओठाच्या वर तिळ असणाऱ्या मुली सुंदर असतात पण मादक असतीलच असे नाही. मादकता पोषाखातून येत नाही अथवा शरीराचे काही भाग उघडे ठेवल्याने येत नाही. पुरुष सुंदर दिसणाऱ्या स्त्रीशी लग्न करतात पण त्यांना बायको मादक हवी असते. त्यामुळेच सुंदर दिसणाऱ्या बायकाही नवऱ्याला आपल्यात फार काळ गुंतवून ठेऊ शकत नाही. सुंदर दिसणाऱ्या बायकोने नवऱ्याला स्वतः स समर्पित केले आणि त्याच्या पोरांना जन्माला घातले म्हणजे त्या नवरा बायकोत प्रेम असतेच असे नाही. आयुष्य फार मोठे असते त्यात प्रेम टिकून राहवे असे वाटत असेल तर रोज नव्याने प्रेमात पडावे लागते त्या कामी फक्त सौंदर्य कामाचे नाही तर मादकता ही लागते. ती नसते म्हणून सौंदर्य पाहून क्षणिक सुखासाठी प्रेमात पडलेले पुढे आयुष्यभर बेचव आयुष्य जगत असतात. प्रत्येक पुरुषाला आपली बायको आणि प्रत्येक बायकोला आपला नवरा सतत मादकच वाटत राहायला हवाअसतो ! ते तसे वाटेनासे झाले की समजायचं आपली सुरुवात झालेय कुत्र्या मांजराचे जीवन जगायला. त्या मादक तरुणीला पाहून आणि पुढचा काही काळ आपण या मादक स्त्री सोबत गप्पा मारणार आहोत या फक्त विचाराने त्याच्या मनात फुलपाखरे उडू लागली होती. ती तरुणी त्याच्या जवळ येण्यापूर्वीच विजय तिच्याकडे एक टक पहात उठून उभा राहिला. ती त्याच्या जवळ येताच तिने हाय ! म्हणत हात पुढे केला विजयनेही हळूच आपला हात पुढे केला तिच्या नाजूक हाताचा स्पर्श त्याच्या हाताला होताच तिचा हात आपल्या हातातून मोकळा करूच नये असे त्याला वाटत होते पण तिच्या नजरेत विजयला स्पष्ट दिसत होते की तिच्या चेहऱ्यावर एका सामान्य माणसाला भेटल्याचा भाव आहे. विजय काही बोलण्यापूर्वीच ती विजयला म्हणाली, सॉरी ! पण मी स्पष्टच सांगते मी तुम्हाला अहो ! जाहो ! नाही बोलणार मी सरळ तुम्हाला विजयच म्हणेन ! तुम्ही मला सरळ यामिनीच म्हणा ! त्यावर विजय तिला म्हणाला," मलाही सारे माझ्या नावानेच हाक मारतात आणि मलाही नावाच्या पुढे नाती लावणारी लोक नाही आवडत ! तुझं नाव छान आहे यामिनी ! तुझ्या नावसारखी तू ही जबरदस्त आहेस ! जबरदस्त आहे म्हणजे ? म्हणजे दिसायला फार सुंदर आहेस, हुशार आहेस आणि स्पष्टवक्ती आणि मोकळ्या विचारांची आहेस ! त्यावर यामिनी म्हणाली, आपण अजून काही बोललोही नाही आणि तुम्हाला कळलेही मी कशी आहे ते ? माझ्या अगोदर तू किती बायकांना जाणून घेतले आहेस ? तिने अचानक विचारलेल्या अनपेक्षित प्रश्नाने विजय बावचळला पण स्वतःला सावरत तो म्हणाला, यामिनी तू फारच विनोदी आहेस. हा ! बस अगोदर मग बोलू ! तू काय घेणार ? त्यावर ती म्हणाली " जे तुम्ही घेणार ? ' विजय मनात म्हणाला,’ मी दारू घेतली तर ही पण घेईल !’ विजय मनात असा विचार करतच होता तो तीच म्हणाली, तुम्ही काय विचार करताय ? हाच ना कि मी दारू घेतली तर ही पण घेईल का म्हणून ? तुला कस कळलं माझ्या मनातलं ? त्यावर यामिनी विनोदाने म्हणाली, ‘त्यात काय नवल सरड्याची उडी कुंपनापर्यंत !’ सॉरी ! पण मला तुम्हाला सरडा नव्हत म्हणायच ! विजय मनात म्हणाला,’ मगाशी घातला आहे ऐवजी परिधान केला आहे असेच म्हणायला हवे होते.’ लाल रंग तुमचा आवडता रंग आहे का ? त्यावर विजय म्हणाला , हो ! आणि तुझा काळा ! निषेधाचा ! त्यावर यामिनी म्हणाली, नाही ! तस नाही गोऱ्या मुलींचा आपण अधिक सुंदर दिसावं म्हणून त्यांचा पांढरा रंग आवडीचा असतो मी काळी आहे पण सुंदर आहे आणि मला अधिक सुंदर दिसण्याची गरजवाटत नाही आणि शेवटी सगळे रंग एकत्र मिसळल्यावर जो रंग तयार होतो तो काळा असतो त्यामुळे तो मला आवडतो आणि मी काळी असतानाही माझ्यावर काळा रंग छान दिसतो पंढर्‍यापेक्षाही ! तुमचं लाल रंगा बाबत तस काही आहे का ? पण तरीही मेंदूला थोडा भार देत तो म्हणाला,’ लाल रंग हा क्रांतीचा प्रतीक आहे ! म्हणून मला आवडतो ? त्यावर यामिनी विनोदाने म्हणाली, ‘ही क्रांती कोण तुझी शाळेतील कोणी मैत्रीण होती का ?’ आता मात्र विजयची हटली होती पहिल्यांदा कोणा स्त्री समोर बोलताना तो इतका हतबल झाला होता.

चहा पिता पिता विजय विषय बदलत यामिनीला म्हणाला,’ तुला माहीत आहे ना आपण येथे कशासाठी भेटलोय ? त्यावर ती म्हणाली रंगावर चर्चा करायला नक्कीच नाही भेटलो, आई म्हणाली म्हणून मी तुला भेटायला आले ! तिला लग्नाची घाई आहे ! आता या संधीचा फायदा घेत विजय म्हणाला, तुझ्या आईला लग्नाची घाई आहे ? मी तुझ्या आईसोबत लग्न नाही करणार आहे हा ? त्यावर यामिनी मनापासून हसत म्हणाली, विनोद छान होता पण मला नाही आवडला. माझ्या आईला वाटत मला लग्नच नाही करायचं म्हणून मी मुलांना फाट्यावर मारत असते त्यात तथ्य ही आहे अजून जो मला फाट्यावर मारेल असा कोणी भेटलाच नाही. तुमचे नाजूक डोळे कसे मगाशी मला पाहिल्यावर बटाट्यासारखे झाले होते सगळ्यांचे तसेच होतात पण त्यांच्या डोळ्यात मला आग दिसत नाही. पण तरीही तुमचे डोळे थोडे वेगळे आहेत इतरांपेक्षा ! तुमच्या डोळ्यात मला माझ्या मादक शरीराबद्दलच आकर्षण दिसलं ते स्वाभाविकच होत पण त्यासोबत काही प्रश्न ही दिसले जे स्वाभाविक नव्हते ! तू दिसायला एकदम साधा दिसतोस पण माझ्यासोबत बोलताना तू विचलित झाला नाहीस. माझी मादकता तुझ्या मेंदूला फारकाळ आपल्या ताब्यात ठेऊ शकली नाही. मी तुझ्यासारख्या सामान्य दिसणाऱ्या माणसाशी लग्न करेंन असं तुला वाटत ? त्यावर विजय तिला म्हणाला, तुला असामान्य नवरा हवाय ! म्हणजे नक्की कसा नवरा म्हणजे पुरुष हवा आहे ?

यामिनी थोडी सावरत बसत म्हणाली ,’मला नवऱ्याच्या रुपात वावरणारा लबाड पुरुष नकोय ! मला नवऱ्याच्या रूपातील माणूस हवाय लिंगभेदा पलीकडे विचार करणारा ! नवरा तर कोणताही पुरुष होतो पण आपले नवरेपण सोडून आपल्या बायकोचा खरा मित्र होणारा नवरा नशिबानेच मिळतो. माझी मादकता पाहून कोणीही माझ्याशी लग्न करायला एका झटक्यात तयार होईल आता तू ही तयार असशील नाही ? त्यावर विजय म्हणाला, हो तुझी मादकता पाहून माझ्यातील चंचल पुरुष क्षणभर विचलित झाला पण तो फक्त तुला पाहून झाला यात तथ्य नाही. तुझ्यासारखी दिसणारी कोणी जरी असती तरी त्याची माझ्या मनाची अशीच प्रतिक्रिया असती. तुला वाटत असेल की मी खूप साधाभोळा आहे पण तस नाही माझ्या लहानपणी मी ही बर्‍याचदा डॉक्टर डॉक्टर खेळलोय ! डझनभर स्त्रिया माझ्या चांगल्या मैत्रिणी आहेत त्या साऱ्या दिसायला तुझ्यापेक्षा सुंदर आहेत. हा !पण तुझ्यासारख्या मादक नाहीत म्हणून मी त्यांच्या प्रेमात पडलो पण फार गुंतलो नाही. त्यांच्या पैकी कोणीही मला फार काळ प्रेमात पाडू शकली नसती मग लग्नानंतर इकडे तिकडे तोंड मारत फिरून बदनामी ओढवून घेण्यापेक्षा मी अविवाहित राहणे पसंत केले, तुझ्या आईला लग्ना ची ! सॉरी तुझ्या आईला तुझ्या लग्नाची चिंता लागलेय म्हणून तू नाईलाज म्हणून मला भेटायला आलीस, नाईलाज म्हणून माझ्याशी बोलतेयस आणि तुला मी एखादा लंगुर या प्रकारात मोडणारा पुरुष वाटलो हे दिसतय तुझ्या डोळ्यात ! तू मनात विचार केलास हा सडकछाप माझ्याशी लग्न करणार ? त्यावर यामिनी म्हणाली, अगदी सडकछाप असा विचार नव्हता केला मी पण तू मला खरच मामु या प्रकारात मोडणारा वाटलास ! आता तू म्हणालास की तुझ्या डझन भर मैत्रिणी आहेत पण त्या मादक नाहीत म्हणून त्यांच्यातील कोणाशीही मैत्रिपलीकडे प्रेमकरून लग्न करण्याचा विचार तुझ्या मनात आला नाही अरे ! पण एखादी मादक स्त्री ! मला सोड ! माझ्यापेक्षाहीमादक स्त्री तुझ्या प्रेमात का पडेल ? ती ही मादक पुरुषच शोधेल ना प्रेमात पडायला ? त्यावर विजय यामिनीला म्हणाला,’ मी तुला सांगू शकतो, मादक स्त्री कशी असते पण तू सांगू शकतेस का की मादक पुरुष कसा असतो ? त्यावर ती क्षणभर स्तब्ध झाली आणि म्हणाली ,’नाही ! मी नाही सांगू शकणार !’ त्यावर विजय म्हणाला, 'तुला माहीत नाही असे नाही ते तुला सांगण्याची लाज वाटतेय !’ आपल्या देशात या विषयावर स्त्रिया स्पष्टपणे बोलणे टाळतात म्हणूनच सारे आयुष्य नरक यातना भोगत काढतात. आपल्या शारीरिक गरजा, उणीवा त्यासोबत समोरच्याच्या गरजा उणीवा न समजून घेता फक्त परंपरा म्हणून लोक आज लग्न करतात आपले एकमेकांवर प्रेम आहे असे स्वतः लाच समजावतात अपघाताने मुलांना जन्माला घालतात आणि मग आपल्या जोडीदाराने आयुष्यभर आपण त्याची शारीरिक गरज भागवू शकत नसताना तो आपल्याशी एकनिष्ठ राहावा अशी अपेक्षा करतात. अपेक्षा भंग झाल्यावर आयुष्यभर त्याला आणि आपल्या नशिबाला दोष देत जीवन जगत राहायचं पण समाजाच्या भीतीने त्याला सोडायच नाही. मरेपर्यंत एक नभरणारी जखम उराशी बाळगून राहायचं.

विजय ! म्हणजे तुझा लग्नसंस्थेवर विश्वासच नाही ? यामिनीने विचारलेल्या या प्रश्नात जोर होता. त्यावर विजय म्हणाला, ' लग्न संस्थेवर माझा विश्वास नाही असं मी म्हणालो तर तू म्हणशील अरे लग्नसंस्था नसती तर तुझा जन्मच झाला नसता हा आता तू जो विचार करतोयस तो वेचार करायला ! पण मी स्पष्टच सांगतो ! कुत्री मांजरे कुठे लग्न करतात तरी त्यांचा वंश वाढतो ना ? आमचा वंश वाढवा म्हणून आम्ही लग्न करतो ! अरे पण वाढलेला वंश पाहायला असतो कोण ? तसही म्हणतात की प्रत्येकाचा वंश दहा पिढ्या झाल्या की संपतो. तुला सांगतो कालच मला माझ्यापेक्षा आठ दहा वर्षांनी लहान असणारा मित्र भेटला होता समाजाच्या नजरेत अंत्यत साधा भोळा भोळसट पण त्याने जे जे उकिरडे फुकले आहेत त्याबद्दल ऐकून मला पेलाभर पाण्यात डुबून मरावस वाटत होत. प्रत्येक आईवडिलांच्या नजरेत आपली मुलं धुतल्या तांदळाची असतात पण ती तशी असतातच असं नाही, आजचे आई- वडील आपल्या मुलांची लग्ने ठरवत नसतात तर फक्त नगाला नग जुळवू पहात असतात. त्यातही अज्ञानामुळे चुकीचे नग जुळवितात.

प्रेम करून लग्न केलं म्हणून लग्ने यशस्वी होत नसतात लग्न केल्यावर आयुष्यभर समोरच्यावर प्रेम करता आलं तर लग्न यशस्वी होतात. प्रेमात कोणीही कोणाच्याही कधीही कोठेही आणि कसाही पडतो. क्षणिक शारीरिक अकर्षणाला प्रेम समजून लोक लग्न करतात मग लक्षात येते आपली शारीरिक गरज पूर्ण होत नाही. तेव्हा प्रेमाच भूत उतरत आणि शारीरिक गरज प्रेमावर स्वार होते. तुझ्याकडे याची काही उदाहरणे आहेत की फक्त हवेत गोळ्या मारतोयस ? त्यावर विजय म्हणाला, मी हवेत गोळ्या मारत नाही पण आजूबाजूला इतक्या घटना घडत असतानाही लोक त्याच्यातून बोध घेत नाहीत याचे मला आश्चर्य वाटते. आता मी तुला दोन - तीन ताजी उदाहरणे देतो ! आता काही वर्षापूर्वीची घटना आहे एक चार मुलींची आई जिची मोठी मुलगी तेरा - चौदा वर्षाची होती ती बाई शेजारच्या दोन मुलांच्या बापाबरोबर पळून गेली. नवरा निर्व्यसनी आणि साधाभोळा असतानाही ! आता तूच मला सांग त्या आई पळून गेल्याचा आता त्या चार मुलींच्या आयुष्यावर काय परिणाम होईल ? दुसरी घटना एका मुलीचे वयांच्या सोळाव्या वर्षापासून प्रेमप्रकरणे सुरु होती. तिच्या आईला वाटले हिचे लग्न करून दिले की ही सुधारेल म्हणून एका सभ्य तरुणाशी तिचा विवाह करून दिला. लग्नानंतर तीन मुली झाल्या आणि ती आपल्यापेक्षा वयाने दहा वर्षे लहान असणाऱ्या तरुणांच्या प्रेमात पडली. सांगायचं तात्पर्य काय तिच लग्न झालं पोर झाली पण तीच लग्न अशा पुरुषासोबत झालं नव्हतं ज्याच्यावर तीच प्रेम होत, लग्न झालं म्हणून तिने आपलं शरीर नवऱ्याच्या स्वाधीन केलं त्यातून त्यांचे जे संबंध आले त्याचा परिणाम म्हणजे त्या तीन मुली ज्न्माला आल्या होत्या त्यांचा जन्मही तिच्या इच्छेतून झालेला नव्हता. ज्या क्षणी तिच्यावर प्रेम करणारा तिला तो भेटला तेव्हा सारी बंधने सैल पडली नैतिकतेच्या सीमा धूसर झाल्या. त्यावर यामिनी म्हणाली,’ ती आपल्यापेक्षा दहा वर्षांनी लहान तरुणांच्या प्रेमात पडली हे तुला चुकीचे वाटते का ? त्यावर विजय म्ह्णाला,’ नाही तिच्या अथवा त्याच्या प्रेमात पडण्याला माझा विरोध नाही पण आपला समाज तो फक्त चित्रपट पाहण्यापुरता पुढारलेला आहे. त्यांच्या नात्याचे भविष्य काय असेल ? फक्त बदनामी ते दोघे आपल्या नात्याला अर्थ देऊ शकतील का ? नाही ! मी पुरुष आहे अविवाहित आहे उद्या माझ्यापेक्षा वयाने वीस वर्षे लहान असणारी मुलगी माझ्या प्रेमात पडली आणि ती म्हणाली,’ माझे तुमच्यावर प्रेम आहे मला तुमच्याशी लग्न करायचे आहे तर मी नाही म्हणणार नाही कारण लग्न न करता तिच्याशी अनैतिक संबंध ठेवण्यापेक्षा लग्न करून समाजमान्य सबंध ठेवलेले कधीही योग्यच ! यावरून मी तुला तिसरं उदाहरण देतो असेच एका तरुणीचे आपल्यापेक्षा वीस वर्षे वयाने मोट्या असणाऱ्या पुरुषासोबत प्रेम सबंध होते साऱ्या जगाला ते माहीत होते तिच्या घरच्यांनी एक अंत्यत साध्या मुलासोबत तिचे लग्न लावून दिले लग्नांनतर तिला एक मुलगा झाला पण त्यांनंतरही त्या पुरुषसोबतचे तिचे सबंध तसेच होते याचा अर्थ वय प्रेमाची मर्यादा ठरवत नाही. ती मर्यादा समाजाने ठरवली आहे ढोबळमानाने ! जे स्त्री पुरुष मग ते कोणत्याही वयाचे धर्माचे अथवा जातीचे का असोनात एकमेकांच्या सानिध्यात असताना सुख आनंद उपभोगतात त्यांनीच लग्न करावं . समाज म्हणतोय म्हणून कोणी कोणाशी लग्न करणे हा स्वतःच स्वतःवर केलेला एक प्रकारे बलात्कारच म्हणावा लागेल. जो आपल्या समाजात हजारो वर्षापासून होत आलेला आहे . यावर यामिनी म्हणाली,' तुमचे विचार फारच बोल्ड आहेत मला वाटलं नव्हतं तुम्ही इतके बोल्ड असाल ? त्यावर विजय म्हणाला,’ मी बोल्ड वैगरे नाही आपल्या देशात उगाच लैगिक विषयांवर बोळणाऱ्याला बोल्ड म्हटले जाते. मी फक्त मला वास्तवात त्या विषयाबद्दल जे वाटते ते बोललो, त्यावर बरं ! म्हणत यामिनी पुढे म्हणाली, ‘तुम्ही काहीही म्हणा पण तुम्ही अजून लग्न केले नाही म्ह्णजे तुमच्यात काही लैंगिक कमतरता अथवा स्पष्टच विचारायचं तर तुम्ही समलैगिक वैगरे नाही ना ? त्यावर विजय यामिनीला म्हणाला, ‘तू काही वेगळा विचार केला नाहीस बहुसंख्य लोक हा असाच विचार करतात अरे ! पण अविवाहित राहणारे अथवा असणारे सारेच समलिंगी अथवा त्यांना काही लैंगिक समस्या असेलच असा विचार लोक का करतात ? कदाचित ! त्यांना लैगिक सुखापेक्षा इतर गोष्टीतून छंदातून मिळणारे सुख अधिक महत्वाचे वाटत असेल अथवा सर्वसामान्य माणसांपेक्षा मोठी स्वप्ने त्यांनी पाहिली असतील अथवा सामान्य माणसांचे सामान्य जीवन जगण्याची त्यांची इच्छाच नसेल, तुला माहीत नसेल कदाचित म्हणून सांगतो विवाहित दोन चार मुलांचे बाप असणारे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सुंदर बायको असणारे समलिंगी पुरुष समाजात आहेत. बायकांचे मला माहीत नाही ! तुला खरे नाही वाटणार पण माझ्या दूरच्या नात्यातील एक माणूस असा आहे हे कळल्यावर मला धक्काच बसला होता. त्याचे हे गुपित बाकी जगापासून आजही गुपितच आहे. माझ्या लहानपणापासून एक समलिंगी व्यक्ती माझ्या संपर्कात होता. माझे त्याचाशी कधी तसे संबंध नाही आले पण त्याने माझ्या भावना चालविल्या होत्या, माझा एक विवाहित मित्रही विवाहित समलिंगी या प्रकारात मोडणारा आहे. हे लोक समाजात अंत्यत बेमालूमपणे वावरत असतात. तो त्याचे बोलणे पूर्ण करतो न करतो तो यामिनीने त्याला प्रश्न केला तुझे कोणा तरुणीशी कधी शारीरिक संबंध आले कि नाही ? त्यावर विजय म्हणाला, ‘मला मादक तरुणी आकर्षित करतात यात तथ्य आहे पण त्यांची मादकता माझ्या विचारांना आणि संस्कारांना कधीच भारी पडत नाही. मी काल ब्रम्हचारी होतो आज ब्रम्हचारी आहे आणि भविष्यात लग्न नाहीच केलं तर ब्रम्हचारी म्हणूनच मरेन पण संस्कारांशी तडजोड नाही ! कोणासाठी ही ! जो पर्यत लोक संस्कारांना धरून होते तो पर्यंत विवाहसंस्थेला महत्व होते. पण आता सारच बदलल आहे मी माझं ब्रम्हचर्य प्राणपणाने जपलं पण मला तशीच स्त्री आज पत्नी म्हणून मिळेल का ? याबद्दल माझ्या मनात शंका आहे . यावर यामिनीने प्रश्न केला, ‘तुला कशी पत्नी हवी आहे ?’ माझ्यासारखी मादक अस म्हणू नकोस हा प्लिज ! त्यावर विजय म्हणाला,’मादकता मला फक्त आकर्षित करते पण त्याहूनही मला स्त्रियांचा गोड आवाज खूप आवडतो ! तुझा आवाजही खूपच गोड आहे मी तुझी मादकता पाहिलेली नसती तर नुसता तुझा आवाज ऐकून तुझ्या प्रेमात पडलो असतो कदाचित ! मला वाटत तुझा आवाज निवेदन करण्यासाठी अत्यंत उत्तम आहे. तुझा आवाज मला तासन-तास ऐकत राहायला आवडेल तू फक्त बोलत राहिलीस तर मला आयुष्यभर तुझा आवाज ऐकत रहावेसे वाटेल. तुझे सौंदर्य कोणा सामान्य माणसाला कधीच कळणार नाही म्हणूनच अजून कोणी तुझ्या प्रेमात पडला नसणार ! तुला नेहमी एक प्रश्न पडत असेल की तुझी मादकता पाहुन लोक बसल्या जागेवर उठून उभे राहतात मग तुझ्या प्रेमात का पडत नाहीत ? या प्रश्नाचे उत्तर मी तुला देतो ! कोणत्याही पुरुषाला आपली दासी होऊन राहणारी पत्नी आणि प्रेयसी हवी असते. तू त्यातली नाहीस आणि महत्वाचे म्हणजे तू स्वातंत्र आणि जगावेगळा विचार करणारी आहेस तू जर भांडी घसण्यात, जेवण करण्यात, पोरांना खेळविण्यात , नटण्या मुरडण्यात आणि बायकांची म्हणून समजली जाणारी कामे करण्यात रमणारी असतीस तर कधीच तुझं लग्न होऊन तू दोन पोरांची आई होऊन सामान्य जीवन जगत भौतिक सुखांचा अनुभव घेत असतीस. पण त्यास्थितीत तुझी स्वतःची स्वतंत्र ओळख नसती जी कदाचित आज असेल . तो पुढे काही बोलणार तोच यामिनीने त्याला प्रश्न केला ,’पण तू अजूनही तू तुझ्या होणाऱ्या बायको कडून काय अपेक्षा आहेत ते सांगितलेच नाही ? त्यावर विजय म्हणाला, मला बाकीच्या पुरुषांना ज्या कामासाठी बायको लागते त्या कामासाठी नको फक्त एक काम सोडून ! मला मोलकरीण असणारी बायको नको ! ती जी कोणी असेल समाजात तिची स्वतःची अशी स्वतंत्र ओळख असायला हवी ! ती कोणावरही अगदी माझ्यावरही अवलंबून नसावी. तशी ती नसेल तर मी तिला तशी ओळख देऊ शकतो पण ती मिळविण्याची तिच्यात क्षमता असायला हवी ! समाजात समाजासाठी काहीतरी मनापासून करण्याची तिची इच्छा असायला हवी ! कुत्र्या मांजरासारखे जगायचे भौतिक आणि शारीरिक सुखे उपभोगत असताना एक दिवस मरायचे ! एका फोटोत फक्त काही दिवस राहायचे आणि मग भूतकाळात विरघळून जायचे ! प्रत्येकाने आयुष्यात स्वतःला एक प्रश्न विचारायला हवा ,’मी माझ्या आयुष्यात असे काय केले आहे की निदान एक वर्षभर तरी ! मी गेल्यावर समाज माझे नाव काढेल ? त्यावर यामिनी विनोदाने म्हणाली,' तुला मोलकरीण असणारी बायको नको मग ! भविष्यात तुझ्या घरातील कामे कोण करणार ? त्यावर विजय म्हणाला, तुला काय वाटत ही कामे पुरुष नाही करू शकत ? अंग ! ही सारी कामे मला उत्तम करता येतात मी शाळेत असल्यापासून ! ती जर समाजसेवेसाठी माझ्या खांद्याला खांदा लावून उभी राहणार असेल तर मला तिच्यासोबत भांडी घासताना आणि समाजात ते जाहीरपणे संगतानाही संकोच नाही वाटणार ! कोणी कोणासोबत किती आयुष्य काढलं याला काही महत्व नसत. ते कसं काढलं याला महत्व असतं. आज समाजात लोक जो भौतिक सुख - साधनाचा विचार करतात त्यांच्या सारखे मूर्ख तेच असतात सुख हे मानण्यावर असते ते कोणत्याही साधनात नसते. महान विचार करणारे जिथे राहतात त्या झोपडीलाही महाला इतकेच महत्व येते. फक्त अन्न प्रत्येकाने समाजाचा विचार केला तर सगळीकडे आंनदाचा प्रकाश पसरेल. पण आम्ही कशात गुंततो मादक शरीर मिळविण्यात जे मिळविण्यासाठीच असते पण तरीही नश्वर असते. कोणाचातरी नश्वर देह मिळविण्यासाठी आपण इतका अट्टहास का करत असतो तेच मला कळत नाही ? त्यावर यामिनी म्हणाली , मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे तू म्हणतोस तशी मी समाजसेवा करायलाही तयार आहे समाजात मी माझी वेगळी ओळख निर्माण करेनच ! पण मला लग्नांनतर मुलं नको हवी असतील तर ? आणि मी जरी किती मादक असले तरी आपले शारीरिक सबंध तेव्हाच येतील जेव्हा माझी इच्छा असेल तुझी असेल तेव्हा नाही तरी तू माझ्याशी लग्न करायला तयार होशील ? त्यावर विजय म्हणाला, हो ! मी एका पायावर तयार आहे. मी जे विचार मांडतो ते फक्त मांडत नाही ते जगण्याचीच माझी तयारी असते आणि त्यातही मी कधीच कोणतीच तडजोड केली नाही आणि भविष्यात करणार नाही. त्यावर उत्साही होत आपल्या जागेवरून उठत टाळ्या वाजवत यामिनी म्हणाली , ‘मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती तुम्ही उगाच प्रसिद्ध लेखक नाही आहात विजय मराठे सर ! मी माझी नव्याने ओळख करून देते मी यामिनी जाधव! काही दिवसापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला मुलाखत देण्यासाठी एक करार केला होतात तेव्हा आमच्या चॅनलने तुम्हाला सांगितले होते आम्हाला वाटेल तेथे वाटेल तेव्हा आम्ही तुमची मुलाखात घेऊ ती मुलाखात आम्ही आजयेथे थेठ घेतली आणि ती आता लाखो लोक थेठ पहात होते. आम्हाला अपेक्षित अशीच मुलाखत झाली ! धन्यवाद !!! आणि माझ्यामुळे काही त्रास झाला असेल तर सॉरी ! आणि हो तुम्हाला माझी आई म्हणून जी भेटली हाती ती माझी आई नव्हती त्यांना आमच्या चॅनेलनेच तसे करायला सांगितले होते. तोपर्यंत विजयच्या भोवती त्याची सही घ्यायला लोक जमा झाले होते आणि विजय त्यावर यामिनीला काहीही न बोलता हॉटेलच्या बाहेर पडला. घराच्या दिशेने प्रवास करीत असताना त्याच्या मोबाईलची रिंग वाजली मोबाईल उचलताच पलीकडून यामिनी म्हणाली, 'आय लव्ह यु !'...



Rate this content
Log in