STORYMIRROR

Vasudha Naik

Others

4  

Vasudha Naik

Others

आवाज पुरुषांचा

आवाज पुरुषांचा

3 mins
0

आवाज पुरुषांचाच…!


 समाजात आजही अनेकदा पुरुषांचाच आवाज मोठा असतो, त्यांच्या निर्णयांना महत्त्व, त्यांच्या मतांना वजन असते... घर असो, समाज असो किंवा एखादे व्यासपीठ, पुरुषांच्या शब्दांना सहज मान्यता मिळते.मग ते मनाला पटणारे नसेल तरी.... पण स्त्रीचा आवाजही तितकाच महत्त्वाचा आहे, तिच्या विचारांनाही सन्मान मिळायला हवा.हे अजूनही काही ठिकाणी मान्य नाहीच. पुरुषप्रधान संस्कृतीच्या मानसिकतेच्या भिंती आजही काही ठिकाणी उभ्या आहेत, स्त्रीच्या कर्तृत्वापेक्षा तिच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित होतात. स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज सगळ्या क्षेत्रामध्ये पोहोचत आहे. पण तिच्या मताला कायम दुय्यम स्थानच दिले गेले आहे अगदी काही ठराविक ठिकाणी तिला मान सन्मान प्राप्त होतो. जिथे स्त्रीच्या मताला खरेच किंमत आहे. आवाज पुरुषांचाच असावा असे नाही, संवाद दोघांचाही असायला हवा. स्त्री पुरुष समानता हवी आहे पण ती अजूनही काही ठिकाणी दिसून येत नाही. अगदी साधी उदाहरण घ्या आपल्या घरामध्ये आपण कितीही कमवत असेल, पूर्ण संसार खंबीरपणे पेलला तरी आपल्या घरातला माणूस घरात बसून असेल तरीसुद्धा पुरुषप्रधान संस्कृतीमुळे तो आपल्याला कायम खालीच बघायला लावतो.... तुला काय समजते??? अशी वाक्ये असतात. माहेरी मुलीला आई-वडिलांचा धाक, सासरी सासू-सासऱ्यांचा आणि पतीचा धाक, मुलं मोठी झाली की मुलांचा धाक तुला काय समजते?? आणि वृद्धपणी तर काही समजत नाही.... अशा भावनांमध्ये गुंतलेली ही स्त्री जर का तिने रणचंडीकेचा अवतार धारण केला तर पुरुषप्रधान संस्कृती टिकेल का??? एखादी स्त्री पुढे जात असेल तर तिच्या यशामागे पुरुषाचा हात शंभर टक्के असतो त्यांना प्रोत्साहन दिल तर ते स्त्री पुढे जाऊ शकते कारण स्त्रीला पुढे मान्यता समाजातच नाही... एक स्त्री पुढे गेलेली आवडत नाही. पण हल्ली जरा चित्र बदललेले दिसते... शहरांमधील स्त्रियांना मानपान दिला जातो. अजूनही ग्रामीण भागामध्ये स्त्रीला म्हणावे तितके वर्चस्व प्राप्त झालेले नाही तिचा मान सन्मान कमी पडतो. पण पुरुषाचा जन्म होण्यासाठी स्त्रीपोटीच होतो हे विसरून चालणार नाही...आणि हो अपत्य जन्मासाठी पुरुषच हवा.... मग स्त्रीला दुय्यम स्थान का बरं??? अधिकार पुरुषांचा आणि जबाबदारी स्त्रीची, ही जुनी समीकरणे आता बदलायला हवीत. बदलत चाललेली आहेत बऱ्याच घरामध्ये. स्त्री-पुरुष समानतेचा अर्थ कुणाचा आवाज दाबणे नव्हे, तर एकमेकांचे विचार ऐकून घेणे आणि आदर देणे होय. प्रत्येकाच्या मताला समान अधिकार प्राप्त करणे होय. जिथे पुरुषांचा आवाज ऐकला जातो, तिथे स्त्रीचाही आवाज सन्मानाने ऐकला जावा हीच मनापासून इच्छा...कारण समाजाची खरी प्रगती एका आवाजात नाही, तर दोन्ही आवाजांच्या समतोलात आहे हे विसरून चालणार नाही. संसाराचा, समाजाचा रथ चालवायचा असेल तर त्या रथाची दोन्ही चक्क समान हवीत. म्हणजेच काय स्त्री पुरुष समानता प्रत्येक मताचा योग्य सन्मान हवा... एका स्त्रीने पुरुषांबरोबर बोलले तर तिचं चारित्र्य खराब आणि एका पुरुषाने स्त्री बरोबर बोलले तर तो संवाद साधतोय.. विचारविनिमय करतोय हा कुठला न्याय बरं... पण हल्ली हे चित्र बदलताना दिसत आहेत. स्त्रीलाही सन्मान प्राप्त होत आहे. आता खरंच असं वाटतंय की पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून ही स्त्री खरोखर आपल्या नावाची उंची प्राप्त करत आहे. पण तिला पूर्ण कुटुंबाचा आधार हवा असतो. सासर, माहेर या सर्वांचा आधार तिला मिळाला शिवाय ती पुढे जात नाही. हे तितकेच खरे आहे. अगदी 9,10 वर्षांपूर्वीची गोष्ट माझ्या घरात मला वेळच मिळायचा नाही.नोकरी, लहान मुलं,काम भरपूर,सासू सासरे.... व्हाट्सअप आलं आणि माझ्या काही सवयी बदलल्या. दररोज रात्री झोपण्यापूर्वी मी लेख किंवा कविता लिहायला लागले. तसं बघायला गेलं तर कवितांचा माझा बाज नव्हता लेखणी मस्त होती. पण हळूहळू शिकले. पहिल्या पहिल्यांदा मी काय करते मोबाईल मध्ये हे पाहून घरातले चिडायचे. काय त्या मोबाईल मध्ये डोकं घालून बसते म्हणायचे. पण रात्री दहा ते बारा माझा स्वतःचा वेळ मी त्यासाठी देतच असायची कोणाचे ऐकले नाही. एकांतात रडले पण लेखन सोडले नाही. बऱ्याच समूहामध्ये मला सर्वांनी घेतले आणि मग हळूहळू माझ्या प्रगतीची पावलं उंचावत गेली. माझ्या घरच्या लोकांना माझा विश्वास पटला आणि मिस्टरांनी पूर्ण साथ दिली. आज आपण सर्व बघत आहात वसुधा नाईकचे वसुधा फाउंडेशन आहे आणि समाजकार्य बऱ्यापैकी सर्वांच्या कानोकानी आहे. आज हा मान सन्मान मिळत आहे तो घरातल्यांमुळेच कारण घरातल्यांनी जा म्हटल्याशिवाय मला बाहेर पाऊल टाकता येत नाही. मग यामध्ये माझ्या मिस्टरांचा सपोर्ट असतो. यातही शेवटी जिंकलं कोण आवाज पुरुषांचाच.... त्यांनी सपोर्ट केल्याशिवाय बाहेर पडू शकत नाही हे 100% खरे आहे. आणि असेच काहीस हे सर्व महिलांच्या बाबतीत होत असेल अशी मला खात्री आहे.... एका स्त्रीच्या मागे पुरुषाचा हात आहे, या सपोर्ट सिस्टीम मुळे स्त्री मागे वळून न पाहे.... वसुधा वैभव नाईक, पुणे मो. नं. 9823582116


साहित्याला गुण द्या
लॉग इन