STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Others

2  

Samiksha Jamkhedkar

Others

आठवण खेड्यातली

आठवण खेड्यातली

2 mins
246

खरच, खेड्यातली सकाळ वेगळीच असते.सकाळचा सूर्य रोज त्यांच्यासाठी नवीन शेताची कामे घेऊन येत असतो, सकाळ झाली की कोणीही माणसे एकमेकांना भेटली की त्यांच्या मुखातून राम कृष्ण हरी, जय हरी माउली, राम-राम हे शब्द ठरलेले असते.


सकाळी उठल्यापासून त्यांची लगबग वेगळीच असते, सकाळी उठल्यावर चुलीतली राख, किंवा लिंबाची जाड काडी त्यांनी दात घासणे,खूप छान आणि स्वछ दात निघतात अस म्हणत त्यांचं सकाळीच तोंड धून होत.


एकीकडे घरातली लक्ष्मी तुरंट्याच्या काड्या चुलीत घालून चहा ठेवते.त्यात गुळाचा खडा टाकून गोड चहा, दुधाच प्रमाण थोडं कमीच असा काळसर चहा पिऊन त्यांचा दिवस सुरु होतो.


किराणा दुकान जवळ असल्यामुळे सामान अस भरून ठेवलेलं त्यांना आवडत नाही.दुकानात जाऊन आतपाव पावशे आणणे हे त्यांना आवडत.


 परंतु कोणी पाहूणा घरी आला की, आनंद खूप असतो तेवढ्या तेवढ आग्रहाने चहा पाजनार ,थोडा थिडक नाही शहरासारखं अर्धा कप ,कप बशीत थोड चहा सांडल्याशिवाय त्यांना चहा दिल्यासारखं वाटत नाही.सगळी कामे आटोपून शेतात जायची तयारी,शेतात बरीच कामे पडलेली असते.


धन्याला पुढे पाठवून घरची लक्ष्मी शेतात त्याचा डबा घेऊन जाण्याच्या तयारीला लागते.


सकाळची चहाची चुल आणखी गरमच असते ,एकदा पेटवली की चहा पाणी, घरचे दूध असेल तर ते तापवणे,कांदे भाज वांगे भाज तिला काही आराम नसतो.पिठाचा डबा घेऊन आरामशीर चुलीतले लाकडे पुढे करत आता भाकरी सुरु होतात.


भाकरी करताना तो थप थप आवाज तालासुरात चालू असतो.पण त्या भाकरीची चव काही वेगळीच असते.


 सगळ्याच्या भाकरी करून झाल्यावर, एखाद लहान मुलं चुलीपुढं रांगत येत त्याच्या हातात मीठ लावलेला भाकरीचा तुकडा दिला की ते लेकरू बिचार मिटक्या मारत चघळून चघळून खात बसत.त्याला काही आईच लागते अस काही नाही, चुलीजवळ आजी, काकू, आत्या कोणी असू दे ,लेकरू भाकरी हातात घेऊन खात असत.


भाकरी झाल्यावर त्याच तव्यावर थोडं तेल ,मोहरी, मिरच्यांचे तुकडे टाकून, थोड्या लसणाचे तुकडे आणि डाळीचं पीठ टाकलं कि झाली खमंग भाजी तयार म्हणजेच पिठलं. वा वा काय छान डबा तयार केला,भाकरी,पिठलं, मिरच्यांचा ठेचा, सोबत दोन, तीन कांदे, असा मायेने डबा बनवुन डोक्यावर रुमालाच्या फडक्यात डोक्यावर घेऊन पायी-पायी तड तड रस्ता चालते .


पोटभर धन्याला खाऊ घालते.सोबत काम करू लागते.लहान लेकरू असेल तर त्याची झाडाला झोळी बांधून हवेशीर सोया लावते आणि लागते कामाला सगळे काम करू परत घरी आल्यावर गरम भाकरी करायला तयार, एवढं थकून भागू आली तरी घरची लक्ष्मी,अन्नपूर्णा कधी गरम जेवण बनवायचं चुकत नाही, आणि शेतातून आणलेली ताजी भाजी शेजाऱ्याला आग्रहाने देणार, वांगी असू दे मिरच्या असू दे, हात मोकळा ठेऊन भाजी पाला वाटणार, त्यात कधी काट कसर करणार नाही.


आपल्या शेतातला माल दुसर्यांना खाऊ घालण्यात आनंद वाटतो. आणि आग्रह करून प्रांजळ मनाने दिलेल्या भाजीपाल्याला वेगळीच चव असते.अशी ही अन्नपूर्णा सतत कष्ट, करणारी, गरिबीला झाकणारी,आहे त्यात समाधान मानणारी, अशा मातेला माझा शतशः नमन


Rate this content
Log in