आशीर्वाद आईचा
आशीर्वाद आईचा
आनंदी ही नेहमीच आनंदी आणि समाधानी रहायची.एकुलती एक मुलगी म्हणून तिचे खूप लाड व्हायचे.आहे त्या परिस्थितीत आई वडील तिचे खूप लाड करायचे.लहानपणापासून तिला तिच्या आईवडिलांनी काहीही कमी पडू दील नाही.तीही खूप समजूतदारीने वागत होती.आहे त्या परिस्थितीत आपणही खुश रहायच आणि आई बाबांना खुश ठेवायचं अस तिनी मनोमन ठरवलेलच होत.अभ्यासात पण ती खूप हुशार होती.नेहमी पहिला नंबर असायचा.यशस्वीरीत्या तिने तिच शिक्षण पार पाडल.आणि नेहमी सगळ्यांकडून तीच कौतुक होत होत. त्या कौतुकाने आई वडिलांचं रोज जणू अंगावरच मूठभर मास वाढत असे. अभ्यासाबरोबर तिला कामाची पण सवय आईने लावली होती.ती नेहमी आनंदीला समजून सांगायची की फक्त पुस्तकी कीडा होऊ नको .अभ्यासाबरोबर घरकामही आलं पाहिजे नाहीतर सासरी गेल्यावर आईचा उद्धार होतो.म्हणून ती घरातली सगळी कामे हळू हळू सांभाळू लागली.स्वयंपाक,ओटा, केरकचरा,धुनी भांडी सणवार स्वयंपाक, त्यात तर तिने आईच्या हातावर हात दीला होता.प्रत्येक गोष्ट निगुतीन कशी वापरायची काटकसर कशी करायची ही सगळ लहानपणापासून ती आईच बघूनच शिकत होती.हळू हळू दिवासमागे दिवस निघून गेले.आणि आता आनंदीच्या लग्नाची चर्चा सुरु झाली.
आनंदी स्वभावानं शांत, सुंदर, हुशार, आणि गोड स्वभावाची मुलगी होती. म्हणून बऱ्याच जणांनी तिला मागण्या घातल्या परंतु आई वडिलांना आपल्या तोलामापाची माणसे हवी होती म्हणून खूप श्रीमंत माणसाची स्थळे त्यांनी नाकारली.एका ठिकाणी आंनदीची सोयरीक जुळली माणसं चांगली आणि तिच्या आईवडिलांना समजून घेणारी भेटली.लग्नाची तयारी चालू झाली.आईने तिच्यासाठी तिच्या पसंतीच्या छान साड्या घेतल्या आपल्याकडून जेवढी हौस करता येईल तेवढी ती करत होती.पण लग्नात आईने मला चांगला शालू देखील घेतला नाही ही गोष्ट आनंदीला कुठंतरी खटकत होती. तरीही ती काही बोलली नाही. नसेल आई बाबांचं बजेट म्हणून ती मनाची समजूत घालून चेहऱ्यावर हसू आणत होती.
आईला ते कळत होत पण तिनेही तस काही वेळेपर्यंत दाखवलं नाही.वडील तर बिचारे पैसे देऊन लेकीचं सगळ कौतुक करत होते.आणि लेक सासरी जाणार म्हणून मधूनच डोल्यात पाणी आणत होते.आणि दुसऱ्या क्षणी आवर लवकर बरेच कामे बाकी आहे म्हणून परत कामाला लागत असे. लग्न दोन दिवसावर येऊन ठेपल. आदल्या दिवशी आई लेकीजवळ जाऊन म्हणाली झाली ना सगळी तयारी काही राहील तर नाही. लेक समजूतदार हो आई झाली सगळी तयारी अस म्हणून शांत बसली.आई हळूच कपाटाकडे गेली आणि हळूच सुंदर असा जरी काठीचा शालू घेऊन आली.आणि आनंदीला दिला.ते पाहून आनंदी म्हणाली आई हा शालू तू तर घेतला नव्हता. हो ग बाळा मी घेतलाच नव्हता पण माझ्या लग्नातील शालू मी जपून ठेवला होता तुझ्यासाठी तो फक्त शालू नाही तर माझा आशीर्वाद समज.आनंदी ने तो शालू घेतला आणि दोघींचे डोळे अनंदादाश्रूंनी डबडबले.त्या शालूत मायेची ऊब होती.आईचा आशीर्वाद हे तिने जाणले लवकर आवरून आईने दिलेला सुंदर शालू घालून आनंदी आनंदान हसतमुखांन मंडपात लग्नासाठी उभा राहिली.
