आजीची गोधडी
आजीची गोधडी
द्वारकाआजी खूप कामाच्या एवढं वय झाल तरी त्यांच काहीतरी काम चालूच असत.हुशार पण तितक्याच एखादी वस्तू आवडली की ती घरी येऊन करून बघायच्या .कामाची पण खूप हौस होती.हाताला तर इतकी चव होती की कोणताही खाण्याचा पदार्थ केला की स्वादीष्ट व्हायचा.त्यांना एकुलता एक मुलगा नोकरीच्या गावाला त्याच नाव विश्वास आणि सूनबाईच कोमल कोमल तशी खूप शिकलेली सरकारी नोकरी असल्यामुळे मुलाला सांभाळायला आजीला घरी आणल होत.मुलगा हर्ष जेमतेम 4 वर्षाचा त्याची आणि आजीची खूप चांगली गट्टी जमली होती.नातू झोपला की आजी रोज गोधडी शिवायची. प्रत्येक दोऱ्याची विन विनतांना ती त्यात जणू माया ओतायची.प्रत्येक धाग्यासोबत तिन नातवासाठी विणलेली उबदार प्रेमाची ती जणू पावतीच होती.थरथरते हात पण एकदम व्यवस्थित, नीटनेटकेपणा तंतोतंत दिसत होता.परंतु कोमल नोकरी करत असल्यामुळे हातात पैसे खेळता असल्यामुळे ती हर्ष साठी सारखी काही न काही आणत असे.तिने त्याच्यासाठी उबदार उलनचे महागडे रग आणले होते.तिला आजीने विणलेली गोधडी आवडत नसे. पण हर्ष दुपारी आई घरी नसली की आजीची गोधडीच पांघरायला घेत असे.आणि शांत झोपत असे ते बघून आजीलाही मनातून आनंद होत असे.
एकदा हर्ष ची आई लवकर ऑफिसमधून घरी आली आणि तिने हर्षलाआजीची गोधडी घेऊन झोपलेलं बघितलं आणि तिने लगेच ती काढून फेकली आणि स्वतः आणलेला वूलनचा रग त्याला दिला.त्यालादेखील आईच्या वागण्याचं वाईट वाटलं आणि तो झोपेतून उठला आणि खेळायला गेला.आता यानंतर ती जुन्या कपड्याची गोधडी घ्यायची नाही अशी सक्त ताकीत आईने हर्षला दिली.आजीने सगळे ऐकले होते तिचे डोळे पाणवले होते.दोन दिवस झाले गोधडी नाही म्हणून तो झोपत नसे.आणि तिसऱ्या दिवशी तर त्याने दुखनेच काढले .ताप सारखा येत होता काही केल्या कमी होईना .दवाखान्यात हर्ष ला दाखल केले असल्यामुळे त्याची आई घरीच होती. आईने मायेने हर्ष ला विचारल बाळा तुला काय हव बाळा अचानक कस दुखण काढल .काहीतरी खाऊन घे. तेंव्हा हर्ष आईला म्हणाला आई माझ्यासाठी एक करशील मला आजीची गोधडी देशील.आता त्याच्या दुखण्याच्या मागच कारण कोमलला समजल आणि तिने लगेच विश्वासला घरी जाऊन आजीची उबदार गोधडी घेऊन यायचं सांगितलं.हर्ष पोटभर जेवला आणि आजीची गोधडी घेऊन शांत झोपला.एक झोप झाल्यावर त्याला एकदम बरे वाटले.दवाखान्यात भेटायला आलेल्या आजीला बघून हर्ष आनंदी झाला आणि म्हणाला आजी मला तुझ्या हाताने अजून एक गोधडी शिवशील.तेंव्हा कोमलला चांगलेच समजले की मुलांना देखील मायेची ऊब कळते तशी ती सासुबाईकडे बघून म्हणाली तू लवकर दवाखान्यातून घरी चल. आजी तुझ्यासाठी आणखी एक गोधडी शिवणार आहे.आणि दुसऱ्या दिवशी हर्ष घरी आला.आणि आजीने आनंदाने दुसरी गोधडी शिवायला घेतली.
