Samiksha Jamkhedkar

Others

3  

Samiksha Jamkhedkar

Others

आईतलं आईपण🙏

आईतलं आईपण🙏

3 mins
358


नेहा ही तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी खूप लाडात वाढलेली.हुशार ,प्रेमळ , लाघवी,मनमिळाऊ, दिसायलाही सुंदर ती कधी कोणाचे मन दुखवत नसे, उलटून बोलणे तर तिला कधी माहितीच नाही.आई वडिलांच्या प्रेमळ सहवासात ती मोठी होत होती .शाळेत देखील हुशार होती .आणि शाळेत सगळ्याना मदत करायची. घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे ती सुख दुःखात सगळ्यांना मदत करण्यासाठी एक नंबर वर असायची.दिवस सरत चालले नेहा मोठी झाली.B. A पूर्ण झाल .आता सगळे तिच्या लग्नाची चर्चा करू लागले विचारपूस सुरु झाली.कधीतरी आपली लेक लग्न करून सासरी जाणारच ,अशी मनाची तयारी करून तिच्यासाठी स्थळे बघण्यास सुरुवात झाली. रूपवान, गुणवान, असल्यामुळे आई वडिलांना तिचे लग्न जमवायला काही वेळ लागला नाही.लग्न जमले सुंदर मुलगा भेटला.घरी सासू, सासरे नणंद, दीर, नवरा सगळे हौशी भेटले .घरातली मोठी सून म्हणून सासू, सासरे दुसरी मुलगी सूनाच्या रुपात भेटली असे म्हणत होते.दीर लहान भावासारखा जीव लावत होता.नदेला तर बहीणी- सारखी हक्काची मैत्रीण मिळाली होती.नवरा पण समंजस आणि प्रेमळ होता. हळू हळू दिवसामागून दिवस जात होते , नेहा तिच्या संसारात चांगलीच रमली होती.मुलगी सासरी खूप सुखात आहे हे पाहून आई वडीलांची चिंता मिटली होती.ते मनोमन आनंदी होत होते.

लग्नाला 5 वर्ष झाले दिवस भर भर निघून गेले.अजूनही घरात पाळणा हलला नाही. नेहाच्या मैत्रिणीचे लहान गोंडस बाळ बघून नेहालाही आई व्हावंस वाटत होत. सगळे तिला सारखे विचारत होते. काय नेहा काही गोड बातमी कधी देणार.पण ती काही कारण सांगून वेळ निभावून नेत होती. पण नशीबा पुढे कोणाचे काय चालते, एकदा मैत्रिणीने नेहाला तिच्या मुलाच्या बारशाला बोलावले, नटून थाटून आवरून सावरून नेहा आनदाने बारशाला गेली.मैत्रिणीलाही खूप आनंद झाला.ती एकटीच आली होती ,तिच्या हातात पर्स होती, त्यात बाळासाठी खूप काही हौशीने तिने आणि तिच्या सासूने बनवलेले स्वेटर टोप्या छान दुपटे होते. तिने सगळं मैत्रीण विना हीला दाखवले, दोघी खूप खुश दिसत होत्या.नेहाला एकटीला बघून तिने तिला काही विचारलं नाही, तिच्या भावना तिला न सांगताच कळाल्या.थोड्यावेळाने न राहून नेहाने सगळे विणाला सांगितले. विनाच्या सासूने ते ऐकले त्या जरा जुन्या विचारांच्या होत्या.आपल्या नातवाच्या कार्यक्रमाला हीला कशाला बोलावले अशी धुसपुस आता विनाला सुरु झाली. वर्षाची तयारी झाली. बाळाला औक्षण करण्याची वेळ आली विनाने नेहाला बोलावले,तें व्हा विनाची सासूबाई म्हणाल्या आग तिला कशाला ? उठलेली नेहा खाली बसणार तेच वीणा म्हणाली, " काही होत नाही कर तू औक्षण." पण विनाच्या सासुच बोलणं नेहाला खटकल कार्यक्रम पार पडला.रडवेला तोंड घेऊन नेहा घरी आली. सासूबाईंनी ओळखलं, हे काही पहील्यांदा घडलं नव्हतं. नेहमी नेहाला टोचून बोलणारे लोक माहित होते .नेहाच्या सासूबाई समजदार होत्या.त्यामुळे नेहाला समजून सांगितल ते हि नेहाला पटलं आणि दोघी आपापल्या कामाला लागल्या.

एक वर्षाचा काळ गेला अचानक नेहा चक्कर येऊन पडली तास सासूबाईंनी तिला दवाखान्यात नेल.सर्व तपासणी झाल्यावर डॉक्टरांनी सांगितलं, नेहा आई होणार आणि तुम्ही आजीबाई तसा दोघींचा आनंद गगनात मावेना.घरी आनंदाची बातमी कळताच नेहाचा पती सार्थक याने सगळ्यासाठी पेढे आणले.सगळे खूप आनंदी झाले.सासर माहेर दोन्ही आनंदाच्या बातमीने खूप खुश झाले. दिवस भरकन गेले नेहाला मुलगा झाला.आजोबा आजी सगळ्यांचे कोडकौतुक सुरु झाले.थोड्या दिवसाने बरश्याचा कार्यक्रम ठरवला त्यात नेहाच्या सासूने विना आणि तिच्या सासूला आग्रहाने बोलावले, आजूबाजूचे सगळे टोमणे मारणारी मंडळी बारशाला बोलावली. नेहाच्या सासूच्या मनात आधीची सल कुठेतरी काळजात खोल होती. बरश्याची गाणी झाली .कार्यक्रम आनंदात झाला,तितक्यात सासूबाईने Mike हातात घेतला आणि मला काही बोलायचे म्हणून त्यांनी सुरुवात केली, आज माझ्या नातवाच्या कार्यक्रमाला आलेल्या माझ्या मैत्रिणी, शेजारी पाजारी, नातेवाईक, आणि नेहाच्या मैत्रिणी, आज आम्ही दोघी सासू सुना आणि नेहाच्या माहेरचे आणि माझ्या घरचे आम्ही सगळे खूप आनंदी आहोत. देवानेच जणू आमचे गाऱ्हाणे ऐकले.आणि एक छोटासा नातू माझ्या पदरात घातला, पण नेहाला जो सगळ्यांचा त्रास झाला सगळे तिला घालून पडून बोलायचे सारखे टोमणे मारायचे, ते दुसरे कोणी नसून सगळ्या स्रियांच होत्या, एक स्त्री एका स्त्रीला इतकं पाण्यात पाहू शकते याचा विचार मी कधी केलाच नव्हता, मी एक स्त्री आहे म्हणू मी नेहाला समजून घेतलं तिला नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. नेहाची आई देखील तिला सारखा आधार देत होती.आमचे घरचे सगळे तिला आनंदी ठेवत होते.पण लोकांच्या तोंडाला आम्हाला हात लावत येत नव्हता इतकंच.काहो तुमची मुलगी त्या जागेवर असती तर तुम्ही असेच वागलं असता का?हा प्रश्न नेहाच्या सासूबाईंनी आलेल्या स्रियांना विचारला, आज ती नेहाच्या सासू म्हणून बोलतच नव्हती मुळी तिच्या आईतलं आईपण बोलत होत.त्यांच्या अशा बोलण्यानं सगळ्या स्रियांच्या माना खाली झुकल्या होत्या.प्रतेक घरात नेहाच्या सासुसारखी सासू स्त्रीचा आदर करणारी स्त्री भेटली तर किती छान हो ना?


Rate this content
Log in