Vasudha Naik

Others

3.0  

Vasudha Naik

Others

आई

आई

1 min
39


आई

मोरपिसी मन

मृदू मुलायम स्पर्श

कुटुंबाची काळजीत अर्पिते तन....


आई

कठोर राहते

मुलांच्या भविष्यासाठी सदा

मुलांच्या भाव विश्वातच रमते....


आई

मऊ भाकरी

मुलांना भरवते घास

मायेने करिते घरच्यांचीच चाकरी......


आई

उंची हिरा

कधीच न तुटणारा

जीवनातील ह्रदयातील आहे तारा....


आई 

ज्ञानाचा झरा

प्रेमाचा जसा पाझर

मायेचा नित्य मनी घागरा...


Rate this content
Log in