“
काही प्रश्न अनुत्तरितच राहतात..कायमचेच! तुटक, अर्धवट..!कधीकधी वाटतं ते तसेच राहिलेत तेच सोयीस्कर आहेत.दरवेळी निदान आपल्या मनाप्रमाणे अर्थ लावता येतो त्यांचा. बंद साच्याचं बंधन नाही,आपल्याला हवे तसे अनुमान काढण्याची मुभा दिलीये अशा अपूर्ण प्रश्नांनी !
”