युद्ध
युद्ध
1 min
12K
लढुयारे लढुयारे लढुया$$रे लढुया || धृ|| फ्रेज
लढुयारे संकटाशी संयमाने लढुया
वाटतसे दिसतसे, कठीण जरी हे
लढुयारे लढुयारे लढुया$$रे लढुया || धृ||
वाटतसे दिसतसे, अंधारले असे
सार कस थांबले, बंद अस पडले
भयाणसे जग अवघे, भयाने हे ग्रासले
मानवाचे जगण्याचे, युद्ध सुरू रे
लढुयारे लढुयारे लढुया$$रे लढुया || धृ||
निश्चयाने धैर्याने, साधेलही सहजची
थांबून थोडे, बसून थोडे, मोह हट्ट सोडूनि
वाचायचे, जगायचे, जिंकायचे रे
मानवाचे जगण्याचे युद्ध सुरू रे
लढुयारे लढुयारे लढुया रे लढुया || धृ||