STORYMIRROR

Rishmita Thakur

Others

2.5  

Rishmita Thakur

Others

येरे येरे पावसा

येरे येरे पावसा

1 min
29.2K



ए पावसा, कुठे हरवलास तू?

आतुरतेचा अंत पाहिलास आता तरी बरस तू


तुझीच वाट बघत घर चालवतोय मी

धान्य संपल , पैसे ही, आता उधारी वर जगतोय मी


धरणीचा पुत्र लोकांना धान्य पुरवतो आणि

एका भाकरी साठी मी माझीच भूक मारतो


दिवस रात्र काबाड कष्ट करुन पीक काढतो मी

आणि बदल्यात सावकरांचे खिसे भरतो मी


कमी पैसे मला देऊन मोठी रक्कम घेतो दुसराच कुणी

सांगा बरं हया भीषण परिस्थितिला कसं सामोरे जायच आम्ही


पोरांचे लाड आणि बायकोचे हट्ट कसे पुरवावे मी

तू पडलाच नाहीस तर जगण्याचीच नाही हमी


तुझी वाट पाहून अनेक मित्र गमावले मी

आता तरी पड बाबा अजून कितीना खांदा देउ मी


माझ्या वर अनेक चित्रपट आणि गाणी बनवली जगाने

पण एकदा माझे घर तु तरी आपुलकी ने बघावे


अन्त झाला आहे आता माझ्या संयमाला

नको रे करु विलंब आता तुझ्या बरसण्याला


ये रे ये रे पावसा करत रोज नव्याने जगतोय मी

आणि रात्री स्वप्नामधे चिंब चिंब भिजतोय मी••




Rate this content
Log in