या साठी का, आपण स्वतःला मारावे?
या साठी का, आपण स्वतःला मारावे?
उकलत नाहीत रे अर्थ, गूढ सगळ्यांचे
जे, न झेपले, ते सहज सोडून द्यावे
ताण करून हलका, थोडे मोकळे राहावे
यासाठी का, आपण स्वतःला मारावे?
रात्रही येतेच, दिवस संपल्यावर
उगा का, प्रकाशास वेठीस धरावे?
अंधारही दाखवतो मार्ग वेगळा
नव्यासाठी का, आपण स्वतःला मारावे?
आपल्याही घरी आहे चूल आणि पोळी
पोटातल्या भुकेनी का मस्तकात जावे
भरल्या पोटी का तू वणवण फिरावे
या साठी का, आपण स्वतःला मारावे?
सोडून गेलेच कोणी तर हसत निरोप द्यावे
येणारच असेल कोणी, म्हणून हे प्रपंच सारे
आ
लेच कोणी, तर का स्वतःला शून्य करावे
या साठी का, आपण स्वतःला मारावे?
किनाऱ्यास लावून नाव आपली
खवळल्या समुद्रास थोडे शांत करावे
वादळ शमवावे की स्वतःच्या जीवावर उठावे
या साठी का, आपण स्वतःला मारावे?
मुक्काम केल्याने प्रवास कुठे थांबतो
मनाच्या कप्प्यात कुणाच्या,
आठवणीसम रुजावेन पाणावले डोळे कुणाचे, असे यत्न करावे
या साठी का, आपण स्वतःला मारावे?
जे सर्वांचे झाले आहे ते आधी करावे
मारायचेच झाले तर आधी मन मारावे
मनाच्या ओझ्यापुढे का जीवाला हलके करावे?
या साठी का, आपण स्वतःला मारावे?