व्यक्त होताना...
व्यक्त होताना...
1 min
25.9K
व्यक्त होताना नको असते समोर कुणी...
माझ्या माहितीच्या जगाबाहेर कुठेतरी...
भावनांना शब्दात अडकवताना वेदनांचे टोचणे...
कोणत्याही नजरेनं पाहून नये आणि मी थांबु नये...
एवढीच एक धडपड!!!
व्यक्त होणं म्हणजे तरी काय?
साचलेलं, अडलेलं, दाटलेलं प्रवाहित करणं इतकच...
वाहत राहतील अविरत, नसेल त्यांच्यावर कुठल्याही नजरेचं लेबल!!!
त्या शब्दातून तेच व्यक्त होणं हे फक्त माझ्यासाठी...
का? कुठे? कधी? कशासाठी? केव्हा? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना
मिळणार नाही कधीही कोणतीही अपेक्षित उत्तरे...
माझं व्यक्त होणं त्यांच्यासाठी फक्त भ्रमनिरास !!!
