वसंत
वसंत
1 min
28.5K
डोळ्यांतल्या घनांचे दुःखास अर्घ्य देऊ
आला वसंत आता नवपालवीस लेऊ।
गर्तेत खोल नेते वैफल्य माणसाला
लोटून त्यास मागे चैतन्य साज लेऊ।
धरणीत आग आहे, चंद्रास डाग आहे
टाळून न्यून त्यांचे सौंदर्य नित्य घेऊ।
झडणार पालवी ही हंगाम संपल्यावर,
जोवर असे बहर हा चित्तात मोद ठेऊ।
हे आपले तराणे गुंजोत आसमंती
गाण्यात शब्द ऐसे, कंठात सूर लेऊ।
