वर्दीतला देव
वर्दीतला देव
1 min
12.3K
विटेवरचा पांडुरंग
पहा वाटेवर आला
कर कटेचे काढून
काठीवर उभा झाला...
खाकी वर्दीत मी देव
उन्हा तान्हात पाहिला
देश वाचवण्यासाठी
प्राण पनाला लाविला...
तुज्या-माझ्या साठी रे तो
घरदार ते सोडून...
विनवितो देव तुला
खुद्द हात रे जोडून...🙏
मी सोडीयेले तुम्हासाठी
मूल-बाळ, घर-दार
अरे माझ्यासाठी तरी बाबा
तुम्ही सोडू नका घर...🙏
भक्तांच्या रक्षणाला
देव पडला बाहेर...
सांगे आळवून देव
आता घर च मंदिर..🙏
वर्दीतल्या देवाला ह्या
लाख मोलाचा सलाम
महाराष्ट्राच्या पोलिसा...
तुम्हा कोटी कोटी प्रणाम !!!🙏