वळीवाचा पाऊस
वळीवाचा पाऊस
1 min
247
अंगाची काहिली काहिली
भेगाळली धरती
तहानलेली कोकीळा
कुहुकुहु करून दमली ॥१॥
तहान श्वानाची भागेना
चोच काउची उघडी
कोमेजल्या तरूलता
सुकुन गेली सृष्टी सारी ॥२॥
म्हणे धरती, म्हणे आकाश
शमवण्या तगमग जिवांची
कधी होईल वर्षाव जिवनाचा
शमवेल तृष्णा जिवांची ॥३॥
ही आस चराचरांची
जणू जाणली त्या मेघानी
गर्दी काळ्या मेघांची आभाळी
शमविण्या तृष्णा धरतीची ॥४
वळीवाचा पाऊस पाहिला
स्वागतास ढगांचा नगारा
रोषणाई नाचऱ्या बिजलीची
मृद्गंध आसमंती बहरला ॥५
तृष्णा वसुंधरेची
पळभर शमुन गेली
स्वप्ने सुखाची हिरवी
बळीराजा मनी डोकावली॥६
