संपली प्रतिक्षा , तो आला ...
संपली प्रतिक्षा , तो आला ...
1 min
212
दाह सोसला किती मी
वाट तुझीच पाहता
चटके सोसले किती मी
वाट पहात अंगणात माझ्या ॥१॥
आला मृद्गंध दुरून
सांगण्या तो निघाला
येईल तो कधीहि
संपवेल तुझी प्रतिक्षा ॥२॥
गडगडाट नभात झाला
चमकली विद्यूत लताहि
जाणुन तो हि आहे
ओढ लागली त्यालाहि ॥३॥
येऊनी तो बरसला
वर्षाव मोत्यांचा झाला
घट्ट मिठित त्याच्या
जिव दोघांचा विसावला ॥४॥
उत्सव मिलनाचा
पर्जन्य आणि वसुंधरेचा
किती जन्मले पुष्प- तृणांकुर
अन् किती स्फुरल्या प्रतिभा ॥५॥
