STORYMIRROR

Pradip Raje

Others

4  

Pradip Raje

Others

कविता : घर माझे

कविता : घर माझे

1 min
264

अजुनहि मनाला खंत वाटते

अजुनहि हुरहुर मनी दाटते

गाव सोडुनि शहरी आलो

आठवण मनी दाटते ॥१॥


विटा मातीचे घर माझे

लाल नळीची कौले

सारवलेल्या जमिनीवरती 

चिमणे बालपण सरले ॥२॥


नारळी - पोफळी झुलती दारी

फणस - काजु घमघमती

पिकल्या आंब्यांचा भार सावरीत

आम्रतरूही डोलती ॥३॥


मऊ भातावर शिळे कालवण

शिळी भाकरी काडी भाजुन

अजुनही जिभेवर चव न्याहरीची

अजुनहि आठवते चुल मातीची॥४॥


ते नदितले डुंबणे,रानोमाळी हुंदळणे

खावुन जांभुळ काजु चिंचा बोरे

पाणी झऱ्याचे पिणे पोटभर

तळपायाच्या भोवऱ्याना आजहि आठवण येते ॥५॥


अजुनहि जर कां असेल कुणाचे

घर असेच गावाकडचे

जपुनि ठेवा जिवापाड ते

सुख स्वर्गा पालिकडचे ...

सुख स्वर्गा पालिकडचे ....॥६॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन