STORYMIRROR

Sarita Kaldhone

Others

4  

Sarita Kaldhone

Others

विषय --मरण

विषय --मरण

1 min
299

क्षण क्षण, पळ पळ पुढे

कधीच निघून जाईल

कणभर आयुष्यात मनभर

जगायचं राहून जाईल...


आयुष्य जगताना नित

दुःखाच्या काट्यावर व्हावे स्वार

सुखाचे क्षण वेचावे 

जपावा हळवा मोत्याचा हार...२


भुकेल्याला द्यावे अन्न

माणुसकीचा धर्म जाणावा

सार्थक करावे जीवनाचे

जगी जीव थोर व्हावा...३


हा क्षण पुन्हा नाही

राहू दे सदा ध्यानी

जगणं व्हावा एक सोहळा

गात आनंदाची गाणी....४


उगाच वाहू नकोस चिंता

कुडीतून निघून जाईल प्राण

मरण कुणा ना चुकले कधी

मरताना वाढव स्वतःची शान...५


Rate this content
Log in