STORYMIRROR

Sarita Kaldhone

Others

3  

Sarita Kaldhone

Others

विषय-- का रे दूरावा

विषय-- का रे दूरावा

1 min
159

आषाढ ,श्रावण सरला आता

नाही ऐकला जलथेंबांचा सूर

कुठे महापूर तर कुठे

किती लावलीस हुरहूर...


ओढ तुझी लागली जगा

नाचला नाहीच मोर

पिक येऊ दे आबादाणी

बळीलाही झोपू दे बिनघोर...


इंद्रधनुचा रंग दिसेना

आभाळाच्या कोंदणात

पालवीने हिरवा शालू पुन्हा

पांघरावा तरू वनात...


नव्या स्वप्नांची वाट

तुझ्यापासूनच उजळते

तुझ्या चिंब स्पर्शाने

चराचर सारे सुखावते


शृंगार धरणीचा खुलव

नको जाऊ रागावून

का रे दुरावा धरलास

जीव गेला वेडावून.....


Rate this content
Log in