Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sneha Kale

Tragedy Others

4  

Sneha Kale

Tragedy Others

विरह

विरह

1 min
47


जन्मोजन्मीची साथ आपली

गेलीस तू अर्धवट सोडून

कसा जगू तुझ्याविना

सांग सखे कसा जगू तुझ्याविना


श्वास होतीस माझा तू

प्राण होतीस माझा तू

अशक्य आता श्वास घेणे

अशक्य आता जगणे तुझ्याविना


डोळ्यांत तुझ्या अडकला होता माझा जीव

हसण्यात तुझ्या गुंतले होते माझे मन

प्राण खेचावे कोणी माझ्या शरीरातून

तसे वाटले होते मला तू गेलीस तेव्हा


किती आसवं गाळली काही गणतीच नाही

मनात खोलवर रुजले होते तुझे प्रेम

अंकुर फुटून घनदाट वृक्षच झाला

तुझ्या साथीने जगण्याचे गुपित उलगडले

तुझ्या हसण्यात मला जीवनाचे सार सापडले


खूप स्वप्न रंगवली आपण

दोघांनी ती जगली सोबतीने

पण घात हा काळाचा

जणू नाही पाहवलं त्याला

हिरावून घेतला माझा श्वास माझ्याकडून


तू असण्याची इतकी सवय झाली होती

की तू नाहीयेस आता हे मन स्वीकारतच नाही

वेड्यासारखा शोधतो तुला

घराच्या प्रत्येक कोपऱ्यात

भकास दिसतंय ते देखील तुझ्याविना

घरातल्या प्रत्येक वस्तू पण 

रडवेल्या झाल्यात


सहज लक्ष जाता माझे

डोळे तिचे बोलू लागले

माझ्याकडे पाहून हसू लागले

तेच तिचे हास्य मनाला घायाळ करणारे

ते पुन्हा आज दिसले


नशिबात नव्हती आपली साथ

म्हणूनच हे अघटित घडले

दोघांना जगायचे होते एकत्र

पण....


आता तू किती दिवस 

विरहाचे ओझे बाळगणार

माझ्या आठवणीत असं

किती दिवस झुरणार

आयुष्य खूप सुंदर आहे रे

पण माझे दुर्दैव जगू नाही शकले

एकच कर माझ्यासाठी

नको राहूस एकटा आयुष्यभर

असावे कोणी सोबतीला

आधार देण्यासाठी प्रेम करण्यासाठी


या जन्मात नाही झाली

स्वप्न पूर्ण आपली

वचन देते मी येईन परत

तुझ्या हाताचा स्पर्श अनुभवायला

तुझे प्रेम मिळवायला

नवीन नाते घेऊन

नवीन चेहरा घेऊन


Rate this content
Log in

More marathi poem from Sneha Kale

Similar marathi poem from Tragedy