व्हर्च्युअल शाळा
व्हर्च्युअल शाळा
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
341
व्हर्च्युअल शाळा आता
झाली आमची सुरू.
मोबाईल,लॅपटॉपच्या स्क्रीनवर
रोज लागली भरू.
मधल्या सुट्टीतला डब्बा नाही,
नाही पुस्तकांचे धोपटे.
रोज असतात सर्व हजर,
तरीही आम्ही एकटे.
मित्र मैत्रिणींची मस्ती नाही,
नाहीत आता त्या गप्पा.
व्हर्च्युअल शाळेच्या या दुनियेत
बंद झालाय तो कप्पा.
सुरुवातीला वाटली होती
या साऱ
Advertisement
्याची मजा,
मित्रांविना ही आभासी शाळा
म्हणजे झालीय आता सजा.
शाळेतील दंगामस्तीला
इथे वाव नाही.
नुसता अभ्यास एके अभ्यास,
गंमत त्यात न काही.
रोज भरते शाळा,
तरी सुने सारे वर्ग.
मुलांच्या आवाजा शिवाय
नाही त्याला अर्थ.
भकास ती शाळा अन्
मैदान लागले कुजबुजू.
कधी येतील मुले,
आणि आम्ही पुन्हा गजबजू.