STORYMIRROR

DrSujata Kute

Others

4  

DrSujata Kute

Others

वेळ

वेळ

1 min
401

नाही वेळ नि:शब्द होण्याची 

नाही वेळ निषेध नोंदवण्याची 

वेळ आहे आता वार करण्याची 

स्वतःचा स्वतः निवाडा करण्याची 


नाही वेळ हळहळ करण्याची 

नाही वेळ मेणबत्ती पेटवण्याची 

वेळ आहे आता प्रतिकार करण्याची 

वाट न पाहता सडेतोड उत्तर देण्याची 


नाही वेळ नुसतेच व्यक्त होण्याची 

नाही वेळ पोकळ चर्चेची 

वेळ आहे आता सामर्थ्य वापरण्याची 

जागच्या जागी सर कलम करण्याची


Rate this content
Log in