अस्तित्व
अस्तित्व
1 min
392
दुर्गेचा अवतार तू
कर घणघणाती वार तू.
अबला नाही सबला तू
वीर तू विरांगणा तू
चल उचल ती समशेर
बन स्वतःची ढाल तू
दाखवून दे तुझे अस्तित्व
या जगाला आज तू
रूपवान तू रूपमती
गुणवान तू गुणवंती
सत्यवानाची सावित्री तू
कर निश्चय लढण्याचा
करूनी अंत सहनशक्ती चा
कर अन्यायावर मात तू
हिरकणी तू, राणी लक्ष्मी बाई तू
सावित्री बाई तू, जिजाऊ माता तू
बस... आता नको राहूस कोमल
बघ स्वतःमध्ये काली माता तू
