वाट पहाती सारे
वाट पहाती सारे
1 min
266
बद झाली लगीन घाई
शाळेला जातानाची,
सहा महिने घरी बसून
नगमग झाली जीवाची...
कवितेचा गोड सूर
कानी पडत नाही,
पाढयाचे आकडे आता
कुणी घोकत नाही....
घंटे लाही पडलं कोडं
काय झाला गुन्हा,
बाकावर बसण्याची गमंत
घ्यायची आहे पुन्हा....
ऑनलाईन शिक्षणाने
निर्माण केला आभास,
मायाळू स्पर्श मुलांचा
मिळत नाही खास....
खडू, फळा क्रीडांगण
वाट पहाती चिमण्या जीवांची,
कधी होईल शाळा सुरू
होळी होऊ दे करोनाची....
