वारी
वारी
1 min
174
पंढरीची वारी आज घरोघरी
व्यक्ती व्यक्ती झाली सज्य वारकरी
टाळ चिपळ्या वाजती ढोल ता ल धरी
जय जय विठ्ठल जय हरी जय हरी
वाट बंद केली तुम्ही ना हो हरी
म्हणून अवतरे घरीच पंढरी
भक्तीच्या पताका,तुळशीहार भाव
हृदयाची हाक ,उभा देव दारी
जय जय विठ्ठल जय हरी जय हरी
उभय कर कटी, कस्तुरी ललाटी
पितांबर पिवळा, चंदनाची उटी
स्वरूप सुंदर सावळा पहिला
भरून वहिल्या डोळा आनंद सरी
जय जय विठ्ठल जय हरी, जय हरी