Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Anupama Bhat

Inspirational

4  

Anupama Bhat

Inspirational

पवाडा

पवाडा

1 min
205


हा पवाडा नाही राणीचा

नाही कोण्या राजाचा

मग आहे तरी कोणाचा?

काना डोळा करू नका

शांत चित्ताने पवाडा ऐका. जी जी जी


देशावर संकट कारोना

सरसवे डॉक्टरची सेना

शत्रूशी सामना करण्या

सलाम करा डॉक्टर्स नर्सेसना. जी जी जी


बहुतां घरून काम सवलत

डॉक्टर सिस्टर काम इस्पितळात

त्यांना फॅमिली अन् सौसर्ग नाही का

देवदूत ते निडर होती रोकण्या हल्ला जी जी जी


साऱ्या जगाची दैना केली

किती गेली किती वाचली

डेड बॉडी नजरे पडेना

नातेवाईक झाले हतबल ना. जी जी जी


भारत सरकारची किती हुशारी

उपाय आधी शोधी परोपरी

लॉक डाऊन उपाय लई भारी

आटोक्यात आणली महामारी जी जी जी


घर दार सर्व सुखे आपणाला

ते नाही रोजगाराला

त्याच्यासाठी देश एक झाला

धर्म जात नाही पहिला जी जी जी


करोडो रुपये मंदिर ट्रस्टी देती

सेलिब्रेटी मागे ना रहाती

उद्योगपती करोडो देती

इस्पितले साहित्य देती 

मुजरा या दानातीला जी जी जी


उन्हा तन्हात ड्यू टी पोलिसाची

उथळ जनतेला अवरण्याची

कफन बांधून बाहेर पडती

जीव त्यांचाही धोक्यात किती जी जी जी


किती डॉक्टर पोलिसांनी जीव गमावले

कर्तव्याला नाही मागे हटले

परिवारास कोणी विचारले

अरे .आरएसएस सरसावले जी जी जी


घरो घरी श्रद्धा वाढली

मंत्र स्तोत्रंनी घरे दुमदुमली

सकारात्मकता वाढली

पोरे बाळे पूजे लागली 

ही देणगी करोनाने दिली जी जी जी


नमन करा तुम्ही सरकारला 

नमन माझे समाजसेवक

सर्वश्रेष्ठ मनी कर्तव्याला

गरी बसा अरिष्ट टल्हण्याला जी जी जी


Rate this content
Log in

More marathi poem from Anupama Bhat