तुम्ही जे काही असता !
तुम्ही जे काही असता !
तुम्ही असे जे काही आमच्यासमोर असता, ते खरंच मागेसुध्दा असेच असता का का हो ?
दिसंताना जसे समोर दिसता तसेच मागेसुद्धा दिसता का हो ?
तेच म्हणायचंय मला, तुम्ही असे जे काही असता !
सांगताना किंवा समजावताना एखादी गोष्ट, खरच मनापासून समजावता का हो ?
समजून घेण्याचा आव दाखवताना, समोरच्याला तसे आजमावता का हो ?
तेच म्हणायचंय मला, तुम्ही असे जे काही असता !
मदत करताना एखाद्याला, खरंच तितके उदार असता का हो ?
दुसऱ्याची गरज म्हणून खरंच निष्पाप कधी वागता का हो ?
तेच म्हणायचंय मला, तुम्ही असे जे काही असता !
हसताना कुणा सोबत उगाच हासू आणता का हो ?
जसं तोंडावर दाखवता, तसं मनातून सुद्धा हसता का हो ?
तेच म्हणायचंय मला, तुम्ही असे जे काही असता !
चालताना कुणासोबत खरंच, त्याच्या वेगाशी बरोबरी करता का हो ?
त्याला मागे टाकण्याच्या शर्यतीत कधीतरी सोबत नेण्याचा विचार करता का हो ?
तेच म्हणायचंय मला, तुम्ही असे जे काही असता !
कोण आपलं कोण परकं, कोण आवडीचं कोण सवडीचं
यांच्यात आपसुखपणातलं आणता का हो ?
नात्यांचा रुबाब मिरवताना, त्यां नात्यांना कधी समजून घेता का हो ?
तेच म्हणायचंय मला, तुम्ही असे जे काही असता !
काहीजण म्हणतात की काहीजण तसे असतात,ते खरंच तसेच असतात का हो ?
आम्हाला वाटणारे मनमुराद निस्वार्थी मनमोकळे आनंदी असे ते कधी नसतात का हो ?
तेच म्हणायचंय मला, तुम्ही असे जे काही असता !
(विशेष आभार- मंगेश पाडगावकर)