STORYMIRROR

Pavan Kamble

Others

4  

Pavan Kamble

Others

तुझ्याविना

तुझ्याविना

1 min
291

तुझ्याविना...


आज थोडं मी शांतच होतो

तुझ्याचं खोल विचारात मी

गुंतत होतो 

तुझ्याविना जगावं कसं

ह्या प्रश्नाच उत्तर मी

शोधत होतो...


गैरसमजामुळे आज हे 

नातं थोडं तुटलं होत

मैत्रीच्या प्रेमात 

काहीतरी चुकलं होत...


तुझ्याविना माझ्या लेखणीनेही

मला आज मुकल होत

काही सुचत नसल्याने 

हे वेड मन आतून काचासारखं

फुटलं होत


काय लिहू आता याच्यापुढं

इथंच थोडं मी फसलो होतो

चेहरा तुझा आठवल्यावर

वेड्यागत थोडं हसलो होतो


सवय झाली मला तुझी ग सखे

मैत्रीच्या प्रेमात नकळतपणे

होतात काही गुन्हे

तुझ्याविना मी आजही आहे उणे


सोड हा रुसवा आता तरी सखे

मैत्री माझी तुझ्याशिवाय

अपूर्ण आहे ग सुमे.. 


तुझ्याविना मित्राला आहे तरी कोण

सांग आता परत येशील ना तू

येताना माझ्या आवडीचं चॉकलेट ही

अनशील ना ग तू...


मैत्रीचा गोडवा तुझ्या हस्यमुळेच दिसतो खुलून

पण पुन्हा कधी रडवून मला

तू जाऊ नको दूर..


तुझ्याविना मी काय अन

माझ्याविना तू काय.. 

माझं हृदय तुझ्यात अन

तुझं हृदय माझ्यात हाय...


जमणार नाही मला कधी

तुझ्याविना जगायला...

हा दिवस बघण्याअधिच मी

आजही तयार आहे मरायला...


 जमणार नाही मला तुझ्याविना जगायला....


Rate this content
Log in