तुझी आणि माझी मैत्री
तुझी आणि माझी मैत्री
तुझी आणि माझी मैत्री
गुळाच्या फुलासारखी
फुलत रहावी
कधी तू कधी मी
पाणी टाकून
मैत्रीचं रोपटं वाढवत रहावी
मैत्रीचं हे आपलं रोपटं
असचं अनेक फुलांनी बहरून जावं
नात्यात कधी द्वेष, कधी भांडण
कधी प्रेम तर कधी मस्ती
असचं आपली ही दोस्ती
घट्ट बनत जावं
आज तुझ्या या वाढदिवशी
छोटीशी गुलाबी कळी तुझ्याचसाठी
शब्द जरी अपुरे असले
तरी भाव पूर्ण आपल्याच मैत्रीचे
आशा तुझ्या आणि माझ्यमैत्रीला
मानाचा सलाम..
कधी आपलं लग्न झालं म्हण
किंवा काही कारणाने
आठवण काढणं बंद
आपण कधीच करायचं नाही
अन आपल्या मैत्रीच्या रोपट्याला
कधीच कोमजू द्यायचं नाही...
आपल्या मैत्रीचं नाव पुढे घेतील
बघ हे नक्कीच सारे
मैत्री ही आपली अशी की
ऐकून आपले काही किस्से
डोळ्यांतही बघ नक्कीच
साचले पाणी..
डोळ्यांतही बघ नक्कीच
साचले पाणी...
