तुझे लपून येणे त्या सांजेला
तुझे लपून येणे त्या सांजेला
1 min
724
तुझे लपून येणे त्या सांजेला
मन लागले होते या वाटेला
निराळी हि चाहूल वेड्याला
शुष्क मृदेला थंडगार ओलावा
ऊन पावसाने खेळ कसा मांडला
तुझसाठी इंद्रधनुष्य हि झुकला
डोंगरदऱ्यांनी हिरवा रंग उधळला
दव मोत्यागत नजरेत तुझ्या चमकला
सगळ्या वाटा रानफुलांनी सजल्या
वारा हळूच तुझे गीत गुणगुणला
तुझ्या भेटीने गाव हे हसलं
माझ्या शब्दांच्या हारमोत्यांनी सजलं
