तळं ..
तळं ..
1 min
444
आभाळ कसं बरसून
मोकळं होत रहातं...
तळं मात्र साठून साठून
गढूळ होत जातं ...
निरभ्र आभाळात वसतो
चांदण्यांचा गाव....
तळ्याच्या मनाचा मात्र
लागत नाही ठाव....
उलटून जाते रात्र
अन् चांदण्यांचा खेळ..
आभाळभर उधळत रंग
येते हळूच पहाट वेळ...
तळं तेच रंग लेवून
शांत पडून रहातं...
खोल खोल आत मात्र
भळभळ वहात रहातं...
झिरपतांना जमिनीत
होतं थेंबां थेंबांनी मुक्त....
पण पुन्हा आभाळ भरून येतं
आणि तळ्यात होतं रिक्त...