STORYMIRROR

Varsha Bhoj

Others

2  

Varsha Bhoj

Others

तिचा आभास

तिचा आभास

1 min
13.5K


पावसाने माझ्या कानात सांगितले

गुज तुझ्या मनीचे वेळीच उलगडले ||

 

तु ही हसलीस पावसाला पाहून

मी ही पाहत होतो तुला वळून वळून ||

 

पावसातही तुझे डोळे बोलले काहीबाही

जणू भिजलेली माती पदर सावरून उभी राही

 

ठिबकत होते केसातून मोती होऊन पाणी

तुला पाहून हृदयाने जाहीर केली आणीबाणी

 

माझ्या स्पर्शाने शहारत होती तुझी कांती

मातीच्या सुवासाने सुगंधित होत होती धरती ||

 

वाफाळलेला होता चहासम हृदयाचा लाव्हा

तुझ्या मंद हास्याने त्यावर जणू रंग चढावा ||

 

त्यातच नेमकी बरसातीला परतण्याची घाई  डोळ्यातील भाव शोधण्या मन माझे संधी पाही

 

शेवटी पावसानेच दिला नजरेने इशारा

कुठूनतरी आला तो खट्याळ वारा ||

 

इरसाल छत्री चालता चालता कोलमडली

तिची भर रस्त्यात त्रेधातिरपीट उडाली ||

 

बावरलेल्या मनाने तिला सावरण्या हाक दिली

 बोलक्या मनाच्या हाकेला अबोल साद दिली ||

 

आरंभला प्रेमाचा मजल दरमजलाचा प्रवास

हाय !

पण हा होता खोडील पावसाने साकारलेला तिचा आभास , तिचा तो आभास ||


Rate this content
Log in