** तहान सुखाची**
** तहान सुखाची**


तिच्या जीवनातही
उन्हाळा आला...
बघता बघता त्या
त्या उन्हाळ्याचा कहर झाला....
लाह्या जश्या फुटे भरभर
तापलेल्या तव्यावर.....
तसाच त्या तहानलेल्या
स्त्री चा जीव खालीवर....
पाहता पाहता तिचा
हिरवागार मळा....
उन्हाच्या चटक्याने
तोही करपला....
तिच्या स्वप्नांची मासोळी
दुःखाच्या कोरड्या सागरात तरंगली....
आणि ती
जणू आनंदात न्हाहली....
जाणता जाणता तिचा
रिकामा घडा...
पुन्हा भरू दे ग तिच्या
सुखाच्या पाण्यानें ग घडा.....