STORYMIRROR

Anuradha Bhokare

Fantasy Others

3  

Anuradha Bhokare

Fantasy Others

स्वप्न, ऋण

स्वप्न, ऋण

1 min
197

*स्वप्न*


विरहात रात जाता

अश्रू दवात न्हाले

पुनवेच्या चंद्राने ते

हळूच टिपून घेतले


रान रानाला कुजबुजले

पान पानाशी झिम्माडले

पुनवेचे स्वप्न माझे

चांदणे दुधात न्हाहले


पुनवेच्या रातीला 

पूर्ण चंद्रमा नभात

चांदण्याचा झुले झुला

आकाशाच्या अंगणात


तारकाचे पुंजके ते

झुलती नभाच्या पाळण्यात 

इकडून तिकडे झोके घेती

खेळ खेळती गगणात


दुधाने न्हाहली धरती

पुनवेच्या रातीला

रासक्रिडेचा खेळ खेळूनी

दमून गेले मी त्या रातीला


चंद्रासवे मी खेळ खेळूनी

स्वन्पातच मी धूंद झाले

साखर झोपेतच अंगांग 

मोहरून गेले 


भेट तुझी नि माझी

स्वप्नातच घडली

तुझ्या मिठीतच रात्र

सारी स्वप्नातच गेली

.......................


*ऋण*


जगी जन्म घ्यावा 

ज्याच्या पोटी

तयाचे ऋण मानावे

अखंडीतासाठी


पहिली माझी गुरू 

आई असती जाणे

तीचमला शिकविती

बोलणे चालणे वागणे


दुसरे माझे गुरू

वडील असती

ते शिकविती

माणूसकिचे धडे


तिसरे माझे गुरू

शिक्षक असती

ज्ञानामृताचे धडे

आम्हा देती


हे खरे देव

हेच खरे ऊध्दारक

दुःख निवारक

तेच असती


ऋण समाजाचे

ऋण पालकांचे

ऋण शिक्षकाचे

सदा आठवावे


ज्ञानाची शिदोरी

जन्मभरीचा ठेवा

नित्य आठवावा

ऋणात सर्वांच्या


Rate this content
Log in

More marathi poem from Anuradha Bhokare

Similar marathi poem from Fantasy