STORYMIRROR

Anuradha Bhokare

Others

3  

Anuradha Bhokare

Others

आई

आई

1 min
203

आई म्हणूनी आता

मी कोणास हाक मारू

आईवीणा पोरकी मी

कोण बरे तारू !१!


तू जन्म दिला म्हणूनी

हे विश्व मी पाहिले

तुझ्याच पायी स्वर्ग

सर्वस्व तिथेची वाहिले !२!


आई तुझ्यावीणा मी

केवळ व्यर्थ भार आहे

माझ्या कर्तुत्वाला तूझ्या

संस्कारांचा आधार आहे !३!


अनंत जन्मे फिरुनी 

ज्न्मेन होऊनी तूझे बाळ

प्रत्येक जन्मी परंतु 

करावास तूच सांभाळ !४!


आई तुझ्या सहवासाचा  

देवासही लळा लागे 

आश्रूच्या लाटावरूनी लाटा

त्यात मी डूंबूलागे !५!


हे हसू नि आसू

तुझीच ठेव आहे

तुझ्यावीणा परी 

सारे रितेच आहे!६!


आई तुझ्या ठाई

पावित्र्य मांगल्याचे

गांभीर्य सागराचे

औदार्य या धरेचे!७!


गुंतले प्राण माझे

पायी तुझ्याच मी ऋणी

वात्सल्य या माऊलीचे

अखंड राहो जन्मोजन्मी!८!


Rate this content
Log in

More marathi poem from Anuradha Bhokare