सुरुवातीची ओळख
सुरुवातीची ओळख


ओळख तुझी माझी झाली कशी
ना बघता ना बोलता
दोघे होतो जवळच
पण बघत होतो दुसरीकडे
ना इशारा ना हसलो
ओळख झाली मनातून
जाणार नाही ध्यानातून
दिवसामागून दिवस जात राहिले
मन आता रमायला लागले
गप्पा मारता मारता
ओळख आता वाढू लागली
मैत्रीचे नाते तयार झाले
स्वभाव समजू लागला
ओढ लागली भेटायची
अजून काही भेटलो नाही
मैत्री आहे भेटल्या शिवाय राहणार नाही