STORYMIRROR

शोभा नलाबले

Others

4  

शोभा नलाबले

Others

सपन

सपन

1 min
28.3K


येती पावसाच्या धारा ढेकळ जिरून झालं लोणी

मोठ्या जोमानं बाप करी शेतात पेरणी

काळ्या माईचं पूजन बाप देहभान हारतो

भुईमाईच्या उदरी सपन उद्याचं पेरतो

'पेरते व्हा'पाखराची होई तरुवरी कुजबूज

रामाच्या पारी बापाचे काळ्या आईशी हितगूज

माय आधार भाकरीचा बाप रानात कष्टी

पाहून कसरत धन्याची माय नजरेत काढी दृष्टी

एक माऊली दुज्या माऊलीला आंजारते गोंजारते

काढी खुरप्यानं रांगोळी जणू काया श्रंगारते

उन्हातान्हात राबे बाप दावित आपुला इंगा

तापलेल्या देहाला देई हळूच पिंगा

निसर्ग दावी रोष पिक करपून जाई

हेलावते मन अन् भान हरपून जाई

कोरडे जाती नक्षत्र कोरड्याच त्या आशा

पूर दाटे पापणीत पडे पदरी निराशा

तळपत्या उन्हात धारा घामाच्या वाहल्या

माझ्या मायेच्या नयनी मोठ्या जोमानं धावल्या

होई हवालदिल तो काळ्या आईचा पुजारी

कसा फुटेना पाझर पाहून बळीराजाची बेजारी

धरणीच्या कुशीत सपन हौसंनं पेरलं

दगा दिला निसर्गानं सपन कुशीतच जिरलं


Rate this content
Log in

More marathi poem from शोभा नलाबले