संकल्प
संकल्प
1 min
213
वर्ष सरले एकदाचे
माझ्यासाठी माझ्या
शब्दांनी भारावलेले
मागील वर्षात
जन्माला आल्या होत्या
माझ्या कित्येक कथा
आणि कविता
लेखाचा जन्म झाला नाही
तिच्यामुळे...जिच्या मी
प्रेमात पडलो होतो
वर्षभर...
माझे शब्द मागील वर्षभर
फक्त आणि फक्त
प्रेमच देत होते
जगाला वाटू लागलं होतं
माझ्या शब्दांची धार
गेली की काय ?
गेला वर्षभर त्यांनाच
धार लावत होतो मी
म्हणूनच यावर्षीचा
माझा संकल्प आहे
शब्दांचा नाही तर
लेखांचा पाऊस
पाडण्याचा...
