STORYMIRROR

Mahesh Rasal

Others

3  

Mahesh Rasal

Others

सलाम तुमच्या कार्याला

सलाम तुमच्या कार्याला

1 min
1.3K

मालक कामगार नातं तुम्ही छान जपलं

सर्वधर्मिय लोकांनासुद्धा केलं तुम्ही आपलं

तुमच्या कार्याची वेगळीच आहे रीत

आपण जपले नेहमीच कामगांंराचे हित

तुमच्या नेतृत्वाने उद्योगांना पुन्हा आली झळाळी

टाटा ब्रँडने स्वतःची छाप सोडली जगात निराळी

जनसेवा आणि देशसेवेने केलीत अनेक ह्दये सर

म्हणूनच तुमच्या कार्याला येणार नाही कोणाची सर

यशाची नव्हती डोक्यात कधीच तुमच्या हवा

टाटा संस्कृतीचा तेवत ठेवला तुम्ही दिवा

खरचं तुमचा हा मोठेपणा

अजूनही जपला आहे साधेपणा

यशाची शिखरे संपादिली दाबून अपयशाच्या गर्तेला

म्हणूनच दुनिया करते सलाम तुमच्या कार्याला


Rate this content
Log in