STORYMIRROR

Mahesh Rasal

Others

4  

Mahesh Rasal

Others

रडायचं नाही फक्त लढायचं

रडायचं नाही फक्त लढायचं

1 min
818

धकाधकीच्या जीवनातून घ्या थोडी उसंत

सर्वाच्या भल्यासाठी घरीच रहाणे करा पसंत

महामारीच्या साथीची बाहेर आहे लाट

विषाणू पाहतोय तुमची आतुरतेने वाट

जनता करफु मुळे सर्वांनी बसा घरी

व्हायरसला नाही मिळणार प्रवेश दारी

कुटुंबा सोबतच करा घरीच मजा

नाही तर मिळेल इस्पितळाची सजा

कोणत्याही कारणास्तव नका पडु बाहेर

भारतीयांच्या एकजुटीचा देवू त्यास आहेर

होस्ट विना विषाणू जमिनीवरच पडेल

संक्रमणांशीवाय तो जागेवरच सडेल

रडायचं नाही आता फक्त लढायचं

कोरोना विरुद्ध युद्ध जिंकायचं


Rate this content
Log in