लढाई कोरोनाची
लढाई कोरोनाची
1 min
487
एक महाभयंकर रोग काय आला
पैशापेक्षा जीव श्रेष्ठ झाला
क्षणार्धात भोतिक सुखाचा फुगा फुटला
जो, तो गावाकडे पळत सुटला
गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
वारंवार हात धुण्याचा नियम पाळा
घरीच भरवा कुटुंबाची शाळा
तरच बसेल महामारीला आळा
भिती आणि अफवांना नका देवू थारा
सरकारी आदेशाचे पालन करा
सध्या ठेवा सामाजिक दुरावा जरा
हाच आरोग्याचा पुरावा खरा
स्वत: बरोबर सर्वाच्या जीवाची करा पर्वा रे
आव्हान करतो मी तुम्हां सर्वा रे
कोरोना विरूद्धची लढाई जिंकू या रे
